रसायन आणि खते मंत्रालय

‘इंडिया फार्मा अँड इंडिया मेडिकल डिव्हाईस 2021’ कार्यक्रमाचे सहावे सत्र 25-26 फेब्रुवारी आणि 1-2 मार्चला होणार


भारतीय औषध क्षेत्राची उलाढाल 2030 सालापर्यंत 130 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा  : केंद्रीय मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा

कोविड विरोधातील खंबीर लढ्याबद्दल भारताची जागतिक स्तरावर प्रशंसा होत आहे: केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय

Posted On: 08 FEB 2021 7:47PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रसायने आणि खत मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा आणि केंद्रीय रसायने आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज इंडिया फार्मा अँड इंडिया मेडिकल डिव्हाईस 2021’ या कार्यक्रमाच्या  सहाव्या सत्राबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेला संबोधित केले. फिक्की आणि इन्व्हेस्ट इंडिया या संस्थांच्या सहकार्याने केंद्र सरकारचा रसायने आणि खत मंत्रालयाचा औषध निर्माण विभाग येत्या 25 आणि 26 फेब्रुवारी आणि 12 मार्च ला औषधनिर्माण आणि वैद्यकीय साधने क्षेत्रासंबंधीच्या या वार्षिक कार्यक्रमाच्या सहाव्या सत्राचे आयोजन करत आहे.

नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देणे, रोगनिदान आणि उपचार सुलभपणे उपलब्ध करून देणे, वैद्यकीय साधनांच्या स्थानिक पातळीवरील निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि आरोग्य सुविधा क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पना राबवून उत्पादन खर्चात आणखी कपात करणे या मुद्द्यांवर भर देत आरोग्य सेवा क्षेत्र नेहमीच सरकारच्या प्राधान्यक्रमाचा अविभाज्य भाग राहिले आहे असे गौडा यांनी यावेळी उपस्थित प्रसार माध्यम प्रतिनिधींना सांगितले. मेक इन इंडियाउपक्रमा अंतर्गत, विविध नवी धोरणे आणि योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडण्याजोग्या दरातील  वैद्यकीय साधने आणि औषधे यांची निर्मिती करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे असेही त्यांनी सांगितले. इंडिया फार्मा 2021 आणि इंडिया मेडिकल डिव्हाईस 2021 विकासाच्या नव्या पर्वासाठी पार्श्वभूमी तयार करतील असे ते म्हणाले.  येत्या 2030 या वर्षापर्यंत भारतीय औषध क्षेत्राची उलाढाल 130 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा असून 2025 सालापर्यंत 50 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची क्षमता भारतातील वैद्यकीय साधने निर्मिती क्षेत्राकडे आहे असेही ते पुढे म्हणाले.

NKP_8178.JPG

मनसुख मांडवीय यांनी सांगितले कि कोरोना महामारीच्या परिस्थितीत भारतीय औषध निर्माण क्षेत्राने देशातील वैद्यकीय गरजा पूर्ण करत सुमारे 120 देशांना आवश्यक औषधांचा पुरवठा केला. भारताने जगातील सर्वात मोठा कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरू केला असून लस मिळविण्यासाठी सारे जग प्रयत्न करत असून त्यात भारत केंद्रस्थानी आहे असे ते म्हणाले. कोविड – 19 आपत्तीचे संधीत रुपांतर करण्याच्या दृष्टीने ही आंतरराष्ट्रीय परिषद  उपयुक्त मंच उपलब्ध करून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतीय औषध उद्योग: सद्यस्थिती हेच भविष्य ही या वर्षीच्या इंडिया फार्मा साठीची आणि इंडिया मेड टेक : जागतिक सहकार्यातून अभिनव संशोधन आणि मेक इन इंडिया ही या वर्षीच्या इंडिया मेडिकल डिव्हाईस ची  संकल्पना आहे. या क्षेत्रांतील विविध विभागांमधील संधी आणि महत्त्वाच्या आव्हानांबाबत परिषदेतील सहभागींमध्ये चर्चा होईल.

***

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696282) Visitor Counter : 174