आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरणाची अद्ययावत स्थिती- 23वा दिवस


देशभरात 58 लाखांहून अधिक आरोग्यसेवा कर्मचारी आणि आघाडीच्या योद्ध्याचे लसीकरण

आज सायंकाळी 6:40 पर्यंत 28,059 लाभार्थ्यांचे लसीकरण

आज एईएफआयची नोंद नाही

Posted On: 07 FEB 2021 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 फेब्रुवारी 2021

 

देशभरात राबविण्यात येत असलेल्या कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाच्या 23 व्या दिवशी आज 58 लाखांहून अधिक आरोग्यसेवा कर्मचारी आणि आघाडीच्या योद्ध्याचे लसीकरण झाले. अमेरिका आणि ब्रिटननंतर भारत आता कोविड-19 लसीकरण करणारा तिसऱ्या क्रमांकाचा  देश झाला आहे.  

आसाम, बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मणिपूर, ओदिशा , राजस्थान, त्रिपुरा आणि उत्तराखंड या 12 राज्यांमध्ये आज लसीकरण कार्यक्रम झाला.  

अहवालानुसार, आजपर्यंत (आज संध्याकाळी 6:40 वाजेपर्यंत) एकूण 58,03,617 आरोग्यसेवा कर्मचारी आणि आघाडीच्या योद्ध्याचे लसीकरण झाले. आतापर्यंत एकूण 1,16,478 सत्रे घेण्यात आली आहेत. आज संध्याकाळी 6:40 वाजेपर्यंत 1,295 सत्रे घेण्यात आली.

एकूण आकड्यापैकी 53,17,760 आरोग्यसेवा कर्मचारी आहेत आणि 4,85,857 आघाडीचे योद्धे  आहेत.

आज सायंकाळी 6:40 पर्यंत 28,059 लाभार्थ्यांना लसी देण्यात आली. यापैकी 12,978 आरोग्यसेवा कर्मचारी होते, तर इतर 15,081 लाभार्थी आघाडीचे योद्धे होते. अंतिम अहवाल आज रात्री उशीरापर्यंत पूर्ण होईल.

अनु.क्र.

राज्य/केंद्रशासित प्रदेश

लसीकरण झालेले लाभार्थी

1

अंदमान आणि निकोबार

3397

2

आंध्रप्रदेश

2,99,649

3

अरुणाचल प्रदेश

12,346

4

आसाम

88,585

5

बिहार

3,79,042

6

चंडीगड

5645

7

छत्तीसगड

1,68,881

8

दादरा आणि नगर हवेली

1504

9

दमन आणि दिव

708

10

दिल्ली

1,09,589

11

गोवा

8257

12

गुजरात

4,46,367

13

हरयाणा

1,39,129

14

हिमाचल प्रदेश

54,573

15

जम्मू-काश्मीर

49,419

16

झारखंड

1,04,371

17

कर्नाटक

3,88,476

18

केरळ

2,92,195

19

लदाख

1987

20

लक्षद्वीप

839

21

मध्यप्रदेश

3,42,016

22

महाराष्ट्र

4,73,480

23

मणिपूर

8334

24

मेघालय

6859

25

मिझोरम

10937

26

नागालँड

4,535

27

ओदिशा

2,76,323

28

पुद्दुचेरी

3532

29

पंजाब

76,430

30

राजस्थान

4,60,994

31

सिक्कीम

5372

32

तामिळनाडू

1,66,408

33

तेलंगणा

2,09,104

34

त्रिपुरा

40,405

35

उत्तरप्रदेश

6,73,542

36

उत्तराखंड

74,330

37

पश्चिम बंगाल

3,54,000

38

इतर

62,057

 

संपूर्ण भारत

58,03,617

लसीकरण मोहिमेच्या तेविसाव्या दिवशी संध्याकाळी 6:40 पर्यंत कोणत्याही एईएफआयची (लसीकरणानंतर झालेला थोडा त्रास) नोंद झाली नाही.


* * *

S.Kane/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1696040)