पर्यटन मंत्रालय

पर्यटन मंत्रालयाचा देखो अपना देश या मोहिमेअंतर्गत "अस्ट्रो-टूरिझम : द नेक्स्ट फन्टियर ऑफ नेचर-बेस्ड टूरिझम" विषयावर वेबिनार

Posted On: 07 FEB 2021 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2021

 

पर्यटन मंत्रालयाच्या देखो अपना देश या वेबिनार मालिकोमध्ये "अस्ट्रो टूरिझम : द नेक्स्ट फ्रन्टियर ऑफ नेचर – बेस्ड टूरिझम" विषयावर सहा फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आला होता, कोविड नंतरच्या काळात उदयास येणाऱ्या निसर्गावर आधारित पर्यटनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करून, शाश्वत आणि एक जबाबदार पर्यटन देण्यावर या वेबिनारचा भर होता. खगोल पर्यटनाच्या शक्यतांचा शोध घेण्यावर वेबिनारमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले, ज्यामुळे दुर्गम समुदायांना सकारात्मक, सामाजिक, आर्थिक तसेच संवर्धनविषयक कार्याचे फायदे मिळू शकतील, तसेच अशा प्रकारचा प्रवास करणे हा एक अतिशय प्रमाणिक आणि पर्यावरणास पूरक असा प्रवासाचा प्रकार आहे.

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त संचालक रुपिंदर ब्रार यांच्या भाषणाने वेबिनारला प्रारंभ झाला. रुपिंदर ब्रार म्हणाल्या की, अस्ट्रो – टूरिझम अर्थात खगोल पर्यटन  ही एक नवी संकल्पना आहे जी सध्या जगभरात चांगलीच रुजत आहे.

ग्लोबल हिमालियन एक्स्पेंडिशन  - जीएचई  हा एक सामाजिक उपक्रम असून हिमालयातील दुर्गम गावात सौर ऊर्जा पोहोचवण्यासाठी प्रभावी मोहीम राबवितात. जीएचईचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयदीप बन्सल यांनी वेबिनार मध्ये  सादरीकरण केले. परिणामकारक पर्यटनाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून, जीएचईने 140 गावांमध्ये विद्युतीकरण करून 60,000 पेक्षा अधिक लोकांचे जीवन उजळविले आहे.

जीएचईच्या जीवनोन्नती साठी खगोल (www.astrostays.com)  या उपक्रमाच्या प्रमुख सोनल असगोत्रा, आणि ऑफिस ऑफ अस्ट्रोनोमी फॉर डेव्हलप्मेंट(ओएडी) संस्थापक  आणि विद्यमान संचालक केविन गोवेंदर या सादरकर्त्यांनी खगोल पर्यटनासंदर्भात माहिती देऊन आणि त्याची शाश्वत आणि जबाबदार पर्यटन चालविण्याची क्षमता आदि  विषयावर  सादरीकरण केले. . त्यांनी अस्ट्रोस्टेट्सबाबत या खगोल पर्यटन चालविणारा एक समुदाय आहे, जो समुदायाला पर्यटनाच्या केंद्रस्थानी मानतो त्यांची माहिती दिली. खगोल पर्यटनाचे  हे मॉडेल अनुभवांचे एक अभिनव रूप आहे. त्याच बरोबर  जगातील दुर्गम आणि ग्रामीण भागासाठी  शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून देण्याबओब्र पर्यटकांसाठी रात्रीच्या स्वच्छ आकाशाच्या निरीक्षणाद्वारे  अनोखे, जीवन बदलणारे अनुभव  घेता येतात.

स्थानिक महिला खगोलशास्त्राची आवश्यक ती माहिती  आणि दुर्बिण वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्या महिला येणाऱ्या पर्यटकांसाठी रात्रीच्या आकाश निरीक्षणाचे सत्र आयोजित करतात. त्यांनी सांगितले की, लडाखया  अति उंचावरील हिमालयाच्या वाळवंटात 35 स्थानिक महिलांना 5 खगोलशास्त्रीय शिबिरांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि यामुळे स्थानिक समुदायांना वार्षिक उत्पन्न मिळत आहे.

खगोल पर्यटणासाठी भारतातील काही प्रमुख ठिकाणांची नावे सादरकर्त्यांनी अधोरेखित केली, त्यात पँगाँग लेक (लडाख), कच्छचे रण (गुजरात), मांडू (मध्यप्रदेश), लाहौल आणि स्पिती (हिमाचल प्रदेश) आदींचा समावेश आहे.

वेबिनारमधील सत्र आता  https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured आणि पर्यटन मंत्रालयाच्या समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत.

* * *

Jaydevi PS/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1695961) Visitor Counter : 247