उपराष्ट्रपती कार्यालय

विलंब, बदल आणि विचलन यांच्याशिवाय वेगाने लोकांपर्यंत विकासकामे पोहोचणे गरजेचे - उपराष्ट्रपती


खासदारांच्या क्षेत्रांमधले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे राज्य सरकारांना आणि स्थानिक प्राधिकरणांना निर्देश

खासदारनिधी योजनेमुळे लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना सक्षम बनवून सेवा देण्याची संधी - उपराष्ट्रपती

‘‘पार्लमेंटरी मेसेंजर इन राजस्थान’’ ग्रंथाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

उत्कृष्ट संसदपटू म्हणून डॉ. अभिषेक संघवी यांचे उपराष्ट्रपतींकडून कौतुक

Posted On: 05 FEB 2021 9:09PM by PIB Mumbai

 

लोकप्रतिनिधी आणि सरकार यांनी विकासकामे विनाविलंब लोकांपर्यंत पोहोचवावीत आणि ही कामे करताना कोणत्याही प्रकारे फेरफार अथवा बदल करू नयेअसे आवाहन उपराष्ट्रपती एम. वैंकेय्या नायडू यांनी आज केले. खासदारांनी केवळ लोकप्रियतेच्या मागे लागू नये त्यांनी लोकांच्या विकासाच्या गरजा ओळखून योजना राबवाव्यात असेही नायडू यावेळी म्हणाले.

‘‘पार्लमेंटरी मेसेंजर इन राजस्थान’’  या ग्रंथाचे प्रकाशन उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते आज करण्यात आले. या आभासी कार्यक्रमामध्ये बोलताना, खासदारांनी आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी मिळणारा निधी संसद आदर्श ग्राम योजनेतून गावाचा विकास करण्यासाठी वापरावा, असे आवाहन केले. डॉ. के.एन. भंडारी यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये राजस्थानमध्ये डॉ. अभिषेक सिंघवी यांनी केलेल्या सूचनांनुसार सन 2006 ते 2018 या 12 वर्षांच्या कालावधीत एमपीएलएडी निधीचा वापर करून आरोग्य आणि शिक्षण उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले, त्याची माहिती देण्यात आली आहे.

एमपीएलएडी योजनेचे उद्दिष्ट लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारांची सेवा करणे आणि त्यांना सक्षम बनविणे आहे, असे नमूद करून व्यंकय्या नायडू म्हणाले, या योजनेतून 1993 पासून 19 कोटींची  आणि  47 हजारांपेक्षा कामे पूर्ण करण्यात आली असून त्यामधून देशभरामध्ये मालमत्ता निर्मितीसाठी मदत झाली आहे.

एमपीएलएडी योजनेतल्या कामांवर तृतीय पक्षांकडून देखरेख ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्याबद्दल आनंद व्यक्त करून यामुळे कामात पारदर्शकता आली असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. राज्य सरकारे आणि स्थानिक प्रशासन यांनी खासदारांकडून आलेल्या शिफारसींकडे लक्ष द्यावे तसेच एमपीएलएडीच्या प्रकल्पांची अंमलबजावणी नियोजित वेळेत करणे सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. अभिषेक संघवी यांनी विधिज्ञ म्हणून आणि खासदार म्हणून केलेल्या कामाचा उपराष्ट्रपतींनी गौरव केला. संघवी यांनी कायदा आणि न्याय संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष योगदान दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. एमपीएलएडी निधीतून कशा पद्धतीने लक्ष्य निश्चित करून, निधीचा विनियोग सार्वजनिक कार्य अधिक चांगला होईल, यासाठी कार्य करण्याचे दिशानिर्देश या पुस्तकातून मिळतात. एमपीएलएडीअंतर्गत विकासकामांसाठी संबंधित भागधारकांना मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक काम करेल, असेही नायडू यावेळी म्हणाले.

या आभासी कार्यक्रमामध्ये  राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, डॉ. अभिषेक सिंघवी आणि इतर खासदार सहभागी झाले होते.

****

S.Thakur/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695666) Visitor Counter : 95