केंद्रीय लोकसेवा आयोग
संयुक्त सचिव आणि संचालक स्तरीय पदांसाठी कंत्राटी तत्वावर लॅटरल भरती
Posted On:
05 FEB 2021 7:28PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या आवश्यकतेनुसार, राष्ट्र उभारणीत योगदान देऊ इच्छिणाऱ्या प्रतिभा संपन्न भारतीय नागरिकांना कंत्राटी पद्धतीने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, महसूल विभाग, अर्थ मंत्रालय आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयात संयुक्त सचिव स्तरावर आणि सरकारच्या खालील विविध मंत्रालये/विभागात संचालक स्तरावर काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे:-
- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
- आर्थिक सेवा विभाग, अर्थ मंत्रालय
- आर्थिक व्यवहार विभाग, अर्थ मंत्रालय
- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
- कायदा आणि न्याय मंत्रालय
- शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय
- उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय
- ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
- जलशक्ती मंत्रालय
- हवाई वाहतूक मंत्रालय
- कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
सविस्तर जाहिरात व सूचना 6 फेब्रुवारी 2021 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केल्या जातील. इच्छुक उमेदवार 6 फेब्रुवारी 2021 ते 22 मार्च 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.
***
S.Thakur/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1695615)
Visitor Counter : 291