नौवहन मंत्रालय

तरंगत्या बांधकामासाठी बंदरे, नौकानयन व जलवाहतूक मंत्रालयाकडून अंतिम नियमावली


संपूर्ण भारतीय किनारपट्टीवर विविध कामांसाठी तरंगत्या जेट्टी/फलाट यांना चालना

Posted On: 05 FEB 2021 7:14PM by PIB Mumbai

 

बंदरे, नौकानयन व जलवाहतूक मंत्रालयाने तरंगत्या बांधकामासाठी अंतिम नियमावली जारी केली आहे. नियमावलीतील तरतुदींनुसार संपूर्ण किनारपट्टीवर भविष्यातील प्रकल्पांसाठी जागतिक दर्ज्याच्या तरंगत्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा दृष्टीकोन यामागे आहे.

या नियमावलीने मरीना, छोटी बंदरे, मासेमारीसाठीची बंदरे, मासळी उतरवण्याच्या जागा, वॉटरड्रोम्स आणि किनारपट्टीवरील अशा प्रकारच्या सुविधांसाठी  तरंगते धक्के/फलाटांची उभारणी करण्याचे विविध तांत्रिक निकष ठरवून दिले आहेत. लघु-बंदरे तसेच मासळी उतरवण्याची सुविधा देण्यासाठीची तरंगती पॉंटून्स/फलाट, तरंगती वेव अँट्युनेटर्स (किंवा ब्रेकवॉटर्स) उभारण्यासाठीही ही नियमावली वापरता येईल.

पारंपारिक क्वे वा बांधलेली कांक्रीट जेट्टी बांधकामाहून तरंगते धक्के / बांधकामे खर्चाच्या मानाने अधिक उपयुक्त, जलद उभारणी व विस्तार करता येणारी आणि दुसरीकडे सहज हलवता येणारी अशी असून पर्यावरण स्नेही आहेत.

बंदरे, नौकानयन व जलवाहतूक मंत्रालयाने गोव्यात तरंगती जेट्टी, साबरमती नदीत तसेच सरदारसरोवर धरणात एअरोड्रोम (सीप्लेन सेवेसाठी) उभारले आहेत आणि त्यांची कामगिरी समाधानकारक आहे.

बंदरे, नौकानयन व जलवाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीय यांनी आपल्या खात्याने एक पायंडा घातल्याचे सांगत जागतिक दर्ज्यानुसार  वैशिष्ट्यपूर्ण मानकांचा अवलंब केल्याचे नमूद केले.

आंतिम मार्गदर्शक नियमावली तसेच तांत्रिक वैशिष्ट्ये/तरंगत्या बांधकामांसाठीची तांत्रिक आवश्यकता (SOTR) http://sagarmala.gov.in /circulars/ guidelines-floating-jetties-platforms-marinas-minor-harbors-fishing-harbours-fish-landing.  येथे पाहता येईल.

ही नियमावली सर्व सागरकिनारा लाभलेल्या सर्व राज्ये, राज्य मेरिटाईम बोर्ड, मुख्य बंदरे,  IWAI व सर्व राज्यांचे फिशरीज विभाग यांना भविष्यकालीन प्रकल्पांना उपयुक्त ठरोल.

****

S.Thakur/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695608) Visitor Counter : 132