रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

चालक प्रशिक्षण केंद्रांना अधिस्वीकृती

Posted On: 05 FEB 2021 2:20PM by PIB Mumbai

 

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने चालक प्रशिक्षण केंद्रांच्या अधिस्वीकृतीबाबत मसुदा अधिसूचना जारी केली आहे. नागरिकांना गाडी चालविण्याचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक गरजा व त्यांच्या पूर्ततेसाठी केंद्रांनी पालन करण्याची प्रक्रिया मंत्रालयाने प्रस्तावित केली आहे. अशा केंद्रांकडून वाहन चालकाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडल्या गेलेल्या कोणत्याही व्यक्तीस वाहनचालक परवान्यासाठी अर्ज करताना वाहन चालविण्याच्या चाचणीच्या आवश्यकतेतून सूट देण्यात येईल, अशी तरतूदही मंत्रालयाने केली आहे.

याद्वारे परिवहन उद्योगांना विशेष प्रशिक्षित वाहनचालक मिळण्यास मदत होईल, जे त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतील आणि रस्ते अपघात कमी होतील.

या संबधीची मसुदा अधिसूचना (जीएसआर 57 (ई) दिनांक 29 जानेवारी 2021) सार्वजनिक सल्लामसलतीसाठी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केली गेली आहे आणि यानंतर औपचारिकपणे ती जारी केली जाईल.

 

U.Ujgare/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1695454) Visitor Counter : 62