संरक्षण मंत्रालय
एअरो इंडिया 2021 मध्ये 70 HTT-40 या प्राथमिक शिकाऊ विमानांसाठी भारतीय हवाईदलाकडून एचएएल ला विनंती प्रस्ताव प्राप्त
प्रविष्टि तिथि:
04 FEB 2021 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2021
बेंगळुरू येथे 4 फेब्रुवारी 2021 रोजीच्या एअरो इंडिया-2021 मध्ये प्राथमिक शिकाऊ विमानांसाठी भारतीय हवाई दलाकडून हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) विनंतीप्रस्ताव प्राप्त झाला आहे. हा प्रस्ताव 70 HTT-40 मुलभूत प्रशिक्षण विमानांसाठी आणि त्याशिवाय अजून 38 विमानांसाठी आहे. एअर स्टाफचे उपप्रमुख एअर मार्शल संदीप सिंग व संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक, (एक्विझिशन) वी एल कंथा राओटा यांनी हा विनंती प्रस्ताव एचएएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक आर माधवन यांना सुपूर्द केला.
कार्यक्रम परिपूर्णता आणि दर्जा तपासणी (PCQR) नंतर या विमानांना प्रमाणपत्र दिले जाईल. एचएएल च्या बंगळुरू व नाशिक येथील दोन कारखान्यात उत्पादन केले जाईल. विमानबांधणी उद्योगात पाउल टाकल्यापासून सहाच वर्षात असा विनंती प्रस्ताव हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडे आला, हा या उद्योगातील सर्वात कमी कालखंडात आलेला प्रस्ताव आहे.
या शिकाऊ विमानात 60 टक्क्याहून जास्त स्वदेशी भाग असतील आणि सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्दीनेस अँड सर्टिफिकेशन (CEMILAC), विभागीय संचालक एअरॉनॉटिकल क्वालिटी अश्युरन्स (RDAQA), एअरक्राफ्ट अँड सिस्टिम्स टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट (ASTE) अश्यांसारख्य़ा संस्थांचे सहकार्य लाभेल.
* * *
S.Tupe/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1695239)
आगंतुक पटल : 182