राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींची 4 ते 7 फेब्रुवारी 2021 दरम्यान कर्नाटक व आंध्र प्रदेशला भेट

Posted On: 03 FEB 2021 8:50PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद 4 ते 7 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत कर्नाटक व आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत.

राष्ट्रपती 4 फेब्रुवारी, 2021 रोजी सायंकाळी बंगलोरला रवाना होतील, ते 5 फेब्रुवारी, 2021 रोजी बंगळुरूच्या येलहंका येथील हवाईदलाच्या तळावरील एअरो-इंडिया-21 च्या समारोप सोहळ्याला संबोधित करतील. कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यांतील माडिकेरी येथे ते 6 फेब्रुवारी 2021 जनरल थिमय्या यांच्या वडिलोपार्जित जुन्या घरात केलेल्या वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन करतील. बेंगळुरू येथील  राजीव गांधी आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या 23 व्या वार्षिक पदवीदान सोहळ्याला ते 7 फेब्रुवारी 2021 रोजी उपस्थित राहतील. त्याच दिवशी नवी दिल्लीला परतण्यापूर्वी ते मदनपल्लीच्या सत्संग फाउंडेशनच्या आश्रमाला व आंध्र प्रदेशातील सादम येथील पिपल ग्रोव शाळेला भेट देतील.

***

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1694938) Visitor Counter : 197