संरक्षण मंत्रालय
एअरो इंडिया-2021 बरोबरच हिंद महासागर प्रदेश संरक्षण मंत्र्यांच्या शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे
Posted On:
03 FEB 2021 5:54PM by PIB Mumbai
भारतात बेंगळुरू येथे 3 ते 5 फेब्रुवारी 2021 दरम्यान होणार असलेल्या आशियातील सर्वात भव्य एअरो इंडिया 2021 शो दरम्यान 4 फेब्रुवारी,2021 रोजी होणार असणाऱ्या हिंदी महासागरी प्रदेशातील संरक्षणमंत्र्यांच्या शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे असेल. “हिंदी महासागरातील वर्धिष्णू शांतता, सुरक्षा व सहकार्य” ही या परिषदेची व्यापक संकल्पना आहे.
18 देशांनी उपस्थित राहून सहभागी होण्याबद्दल 30 जानेवारी 2021 पर्यंत पुष्टी दिली आहे.
हिंदी महासागर प्रदेशांतील शांतता, स्थैर्य व संपन्नता यांच्या जपणूकीसाठी संस्थात्मक, आर्थिक, व सहकार्याच्या वातावरणात चर्चेला चालना देणे हे या परिषदेमागील उद्दिष्ट आहे.
भौगोलिकदृष्ट्या भारत हिंद महासागराच्या मध्यभागी असून त्याला 7,500 किमीची विस्तिर्ण किनारपट्टी लाभली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
****
M.Chopade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694824)
Visitor Counter : 293