आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी डिजिटल माध्यमातून भारतीय बालरोगशास्त्र अकादमीच्या 58 व्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषविले

Posted On: 03 FEB 2021 5:32PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज डिजिटल माध्यमातून भारतीय बालरोगशास्त्र अकादमीच्या 58 व्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

भारतीय बालरोगशास्त्र अकादमीच्या कार्याचे कौतुक करताना डॉ. हर्ष वर्धन यांनी नमूद केले, मला माहिती आहे की बाल आरोग्य विषयक अनेक मुद्द्यांवर भारतीय बालरोगशास्त्र अकादमी भारत सरकारबरोबर सतत कार्यरत आहे. पोलिओ निर्मूलन, लसीकरण, जंक फूडवरील मार्गदर्शक तत्त्वे, महामारी दरम्यान सरकारला मदत करणारे, सूक्ष्मजीवांविरोधात प्रतिकार, आमच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात क्षयरोगाविरूद्ध लढा, कुपोषणाचा मुकाबला करणे, तसेच पौगंडावस्थेतील आरोग्य याअनुषंगाने तुमचे कार्य व समर्थन उल्लेखनीय आहे. भारतीय बालरोगशास्त्र अकादमीत प्रत्येक राज्यातील 30,000 हून अधिक सभासद आणि राज्य शाखा तसेच 350 शहर शाखांमध्ये मोठ्या संख्येने बाल आरोग्याशी संबंधित सरकारच्या कार्यांसाठी उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.

यावर्षी अकादमीतर्फे मुलांशी संबंधित 100 सामान्य परिस्थितींवर पालक मार्गदर्शक सूचना राबविण्याच्या नियोजनाविषयी आनंद व्यक्त करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, हा एक अतिशय चांगला आणि उपयुक्त दस्तावेज असेल जो भारतीय पालकांसाठी अमूल्य ठरेल."

सुधारित नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम (एनएसएसआर) मॉड्यूलच्या आधारे तुम्ही ऑनलाईन साधने विकसित केल्याबद्दल हर्षवर्धन यांनी कौतुक केले. भारतीय बालरोगशास्त्र अकादमीने तिच्या डीआयएपी मंचाद्वारे मागील वर्षभरात ऑनलाइन प्रशिक्षण कला परिपूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिजिटल भारत तसेच आत्मनिर्भर भारत हा दृष्टिकोन भारतीय बालरोगशास्त्र अकादमी विकसित करत आहे.

युनिसेफ आणि डब्ल्यूएचओ च्या आर्थिक मदतीतून साकारलेला भारतीय बालरोगशास्त्र अकादमीचा दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प शिशुविकास हा वेगळी वाट चोखाळणारा, महत्वाचा, प्रभावी प्रकल्प असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी यावेळी नमूद केले.

 

S.Tupe/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1694816) Visitor Counter : 186