पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

दिल्लीतील सर्व औद्योगिक आस्थापनांना स्वच्छ इंधन पुरविण्यात येणार

Posted On: 03 FEB 2021 4:32PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय राजधानी परीसर (एनसीआर,नॅशनल कॅपिटल रीजन) आणि त्याच्या आसपासच्या भागांत, नव्याने स्थापन झालेल्या शुद्ध हवा व्यवस्थापन आयोगाने (कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट) भागांत दिल्लीतील औद्योगिक आस्थापनांमधे बदल करून स्वच्छ इंधनाच्या वापराला प्राधान्य देण्याचे काम हाती घेतले आहे.

हे कार्य करताना 50 औद्योगिक वसाहतीत असलेल्या 1627 औद्योगिक संचांनी (आस्थापना) बदल घडवून आणत पाईप्ड नॅचरल गॅसचा वापर सुरू केला आहे.गेल(GAIL), इन्द्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL), दिल्लीतील राष्ट्रीय राजधानी परीसर (NCT) सरकार ,यांनी नित्यनियमाने याचा पाठपुरावा केला.

1607 औद्योगिक संचांनी बदल करत पारंपरिक अधिक प्रदुषण करणाऱ्या औपचारिक इंधनापेक्षा पीएनजीच्या वापराला सुरुवात केली आहे. उर्वरित 20 औद्योगिक वसाहती ज्या सध्या एलपीजी चा वापर करत आहेत त्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत पीएनजी कडे वळतील, अशी अपेक्षा आहे.

 

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1694773) Visitor Counter : 200