वस्त्रोद्योग मंत्रालय
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पोर्टलवर 31 जानेवारी 2021 ते 4 फेब्रुवारी 2021 पर्यंत चालणाऱ्या 8व्या आंतरराष्ट्रीय रेशीम मेळाव्याचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
31 JAN 2021 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2021
केंद्रीय महिला आणि बालविकास तसेच वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी यांनी 8 व्या आंतरराष्ट्रीय रेशीम मेळाव्याचे आज दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. हा मेळावा भारतीय रेशीम निर्यात प्रोत्साहन परीषदेच्या व्हर्च्युअल पोर्टलवर एकाच छत्राखाली भरविलेले भारतातील सर्वात मोठे रेशीम प्रदर्शन असून ते दिनांक 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2021पर्यंत सुरू रहाणार आहे. कोविड-19महामारीमुळे हा उपक्रम दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन करताना श्रीमती इराणी यांनी सांगितले की प्रदर्शनात 200 हून अधिक परदेशी खरेदीदारांनी पूर्वीच नोंदणी केली आहे आणि तितक्याच प्रमाणात त्यांचे भारतातील प्रतिनिधी 100 पेक्षा अधिक रेशीम बनविणाऱ्या आणि मिश्रित रेशीम व्यापार करणाऱ्या नामांकित आणि विशाल भारतीय कंपन्या व्हर्च्युअल प्लॅटफॉमवर संवाद साधतील. भारतातील रेशमाचे सौंदर्य आणि वैविध्य साजरे करण्यासाठी प्रदर्शनकर्ते आणि परदेशी खरेदीदारांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मंत्रीमहोदयांनी यावेळी केले.
भारतीय आंतरराष्ट्रीय रेशीम मेळावा हा वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय रेशीम निर्यात प्रोत्साहन परीषदेच्या वतीने आणि वाणिज्य मंत्रालयाने प्रायोजित केलेला रेशीम आणि रेशीम मिश्रित उत्पादनांसाठी असलेला महत्त्वाचा मेळावा आहे. भारताला रेशीम उत्पादनांचा दीर्घ इतिहास असून रेशीम उत्पादनात तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारत हा जगात एकमेव असा देश आहे की जो रेशमाच्या चार प्रमुख प्रकारांची निर्मिती करतो त्या म्हणजे मलबेरी,एरी,टसर आणि मूगा आणि विविध प्रकारची उत्पादने म्हणजे पोशाख, कापड आणि साड्या याशिवाय गालिचे, अद्ययावत रेशीम वस्त्रे, भेटवस्तू, स्कार्व्ज,स्टोल्स,घर सजावटीच्या वस्तू, पडदे इत्यादी तयार करतो.भारतात रेशमाची 11वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक ठिकाणे आहेत उदाहरणार्थ, पोचमपल्ली,ईकत,चंद्रपाँल रेशीम, म्हैसूर सिल्क, कांचीपुरम सिल्क, मूगा सिल्क, सालेम सिल्क, अरनी सिल्क, चंपा सिल्क, भागलपूर सिल्क, बनारस (ब्रोकेड आणि साड्या ) इत्यादी.
कोविड-19 महामारीमुळे निर्यातदारांसमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांमुळे सरकारला आणि व्यापारांना व्यवसायाच्या वैकल्पिक पर्यायांचा स्विकार करावा लागला आणि प्रथमच अशा व्हर्च्युअल पध्दतीने परीषदेला रेशीम मेळाव्याचे आयोजन करावे लागले आणि यामुळे परदेशी व्यापार भागीदारांशी पुनश्च संपर्क या मेळाव्याद्वारे होणे अपेक्षित आहे.
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1693794)
आगंतुक पटल : 257