अर्थ मंत्रालय

शाश्वत विकास हा भारतीय विकास रणनीतीमधील गाभा; त्यासाठी शाश्वत आर्थिक उत्तेजन आणि व्यापक आर्थिक सुधारणा -आर्थिक सर्वेक्षण

Posted On: 29 JAN 2021 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2021

 

शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिमाणांचे एकत्रीकरण करून भारतासाठी सर्वसमावेशक विकासात्मक कार्यसूची समाविष्ट करतात. केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या आर्थिक वर्ष 2020-21 साठी आर्थिक सर्वेक्षणात या दृष्टिकोनावर भर दिला. 

कोविड महामारीच्या जबरदस्त परिणामाचा प्रतिकार करण्यासाठी केवळ राष्ट्रात, राष्ट्राराष्ट्रामध्येच नाही तर पिढ्यांमध्येही समानता आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

भारत आणि शाश्वत विकास उद्दिष्टे

सर्वेक्षणात नमूद केले आहे की एसडीजींना सरकारच्या धोरण, योजना आणि कार्यक्रमांमध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारताने अनेक सक्रिय पावले उचलली आहेत.

कोविड -19 महामारीच्या अभूतपूर्व संकटामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा उल्लेख या सर्वेक्षणात आहे. तसेच  शाश्वत विकास हा भारतीय विकास रणनीतीमधील गाभा असल्याचे यात म्हटले आहे.

हवामान बदल

आर्थिक सर्वेक्षणानुसार भारत हा अनेक सक्रिय हवामानविषयक उपक्रम राबवित आहे. त्यात हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजना (एनएपीसीसी), जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान (जेएनएनएसएम), हवामान बदल कृती योजना (सीसीएपी), हवामान बदलावरील राष्ट्रीय अनुकूलन निधी तसेच भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि उत्पादनासाठी त्वरित अंमलबजावणी यासारख्या सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे. 

शाश्वत हवामान वित्तपुरवठा

समाज कल्याणकारी उद्दीष्ट साकार करण्यासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक उपक्रमांद्वारे भांडवल उभारण्यासाठी सेबीच्या नियामक तत्वाखाली भारत एक सामाजिक शेअर बाजार (एसएसई) उभारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

या सर्वेक्षणात चीननंतर उभरत्या बाजारात भारत दुसर्‍या क्रमांकाचा हरित बॉन्ड मार्केट असल्याचे नमूद केले आहे. 2017 मध्ये, भारतातील ग्रीन बॉन्ड्सच्या चलनास पाठबळ देण्यासाठी सेबीने भारतीय शेअर बाजारात हरित बॉन्डच्या यादीसह हरित बाँडसंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केली. 24 डिसेंबर 2020 पर्यंत भारतात आठ ईएसजी म्युच्युअल फंड सुरू झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा पुढाकार

विकासाचे शाश्वत मॉडेल विकसित करण्यासाठी आणि आपत्ती निवारक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जागतिक स्तरावर भारताने घेतलेल्या पुढाकारांचा सर्वेक्षणात उल्लेख आहे.

1. आंतरराष्ट्रीय सौर युती (आयएसए) ने नुकतीच जागतिक स्तरावर सौर ऊर्जा क्रांती घडवून आणण्यासाठी ‘वर्ल्ड सोलर बँक’ आणि ‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड इनिशिएटिव्ह’ या दोन नवीन उपक्रमांची सुरूवात केली आहे. आयएसए सचिवालयानं नुकतीच जागतिक सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांचा समावेश असलेल्या ‘शाश्वत हवामान उपक्रमांसाठी युती’ सुरू केली आहे. सदर देशांना कला आणि अद्ययावत सौर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी प्रथम जागतिक सौर तंत्रज्ञान परिषदेचे (डब्ल्यूएसटीएस) आयोजन केले होते.

2. आपत्ती निवारण पायाभूत सुविधांसाठी युती: राष्ट्रीय सरकारद्वारे सर्वसमावेशक बहु-भागधारक व्यासपीठ म्हणून युती कार्य करते, जिथे आपत्ती निवारणाच्या पायाभूत सुविधांचे विविध पैलू जाणून घेऊन त्यांची देवाणघेवाण केली जाते. सीडीआरआय ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्राची लवचीकता वाढविण्यावर काम करीत असून सर्व खंडातील देश आणि विविध स्तरातील विकास आणि जोखीम यात या देशांना समाविष्ट करण्यासाठी आपली सदस्यता वाढविण्याच्या विचारात आहे.


* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1693411) Visitor Counter : 10219