अर्थ मंत्रालय

भारताचा प्रतिसाद विशेषत: स्पॅनिश फ्लूशी संबंधित महामारीविज्ञान आणि आर्थिक संशोधनावर आधारित होता: आर्थिक सर्वेक्षण


अनिश्चितता खूप जास्त असल्यास सर्वात वाईट परिस्थितीत होणारे नुकसान कमी करण्यावर लक्ष केंद्रित

Posted On: 29 JAN 2021 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2021


“संकटात असलेल्यांचे जीवन वाचविणे हेच धर्माचे मूळ आहे”, आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करताना, कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संकटाला तोंड देताना लोकांचे प्राण आणि उपजीविका वाचविताना भारताने स्विकारलेल्या धोरणांचे स्पष्टीकरण देताना   महाभारतातील या वाक्याने सर्वेक्षणाची  सुरवात करण्यात आली.

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, कोविड-19 साथीचा आजार हे शतकानंतर  उद्भवलेले वैश्विक संकट आहे.  2020  या वर्षात यापायी जगातील सर्वात 90 टक्के देशांना दरडोई जीडीपीमध्ये घसरण सोसावी लागण्याचा अंदाज होता. या पार्श्वभूमीवर, दीर्घकालीन फायद्यासाठी अल्पकालीन वेदना सोसण्याच्या तयारीने भारताचे प्रयत्न जीवन आणि उपजीविका वाचाविण्यावर  केंद्रित  होते. 

दाट लोकसंख्या असलेल्या भागात विषाणूचा वेगवान प्रसार होण्याचा धोका अधिक प्रमाणत असतो आणि साथीच्या सुरुवातीच्या काळात हा धोका जास्त असतो.  130 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या देशात हा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीच्या उपायांच्या संदर्भात हा महत्त्वपूर्ण धोरणात्मक परिणाम होता, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे. 

भारताचा प्रतिसाद विशेषत: स्पॅनिश फ्लूशी संबंधित महामारीविज्ञान आणि आर्थिक संशोधनावर आधारित होता, ज्यात असे स्पष्ट होते की देशात लॉकडाऊनचा निर्णय त्वरित घेतल्याने लोकांचे जीव वाचविण्यासाठी एक विजयी-धोरण प्रदान केले गेले आणि मध्यम ते दीर्घावधीत आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून सुरक्षित संरक्षित उपजीविका निर्माण केल्या गेल्या.  हे धोरण विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी आणि लोकांमधील संपर्क कमी करून साथीच्या आजाराचा संसर्ग कमी करण्यासाठी तसेच लोकांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावण्याच्या अनुषंगाने देखील आखण्यात आले होते.

V1C1.jpg

भारताचा प्रतिसादः अल्पकालीन वेदना, दीर्घकालीन लाभ

वेळेचे महत्व सांगण्यासाठी आर्थिक सर्वेक्षणात स्पॅनिश फ्लूचे उदाहरण दिले आहे - लवकर आणि व्यापक स्तरावर लॉकडाऊन लावल्यामुळे मृत्यू दर कमी होण्यास मदत झाली.  म्हणूनच धोरणकर्त्यांनी सुरुवातीच्या सर्वात वाईट परिणामांना रोखण्यासाठी अडथळा पद्धतीचा अवलंब केला आणि विविध अभिप्रायांवर आधारित उपाय योजना  वेळोवेळी स्पष्ट करण्यात आल्या. 

प्रारंभिक लॉकडाउनची कार्यक्षमता

सर्वेक्षणात नमूद केलेल्या देशव्यापी विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की अमेरिकेतील कोविड-19 स्थितीशी तुलना केली तर भारताने कोविड-19 च्या प्रसार रोखण्यासाठी आणि अंदाजित मृत्यू दर कमी राखण्यासाठी उत्तम व्यवस्थापन केले गेले. भारतात 37.1 लाख नागरिकांच्या मृत्यूचा अंदाज वर्तविण्यात आला होता.  तर अमेरिकेत मात्र  कोविड-19 ची रुग्णसंख्या ही अंदाजित 62.5 पेक्षा अधिक आहे. याच मॉडेलचा अंदाज आहे की 1 लाखाहून अधिक लोकांचे जीव वाचले.

आंतरराज्यीय विश्लेषणातून असेही दिसून आले आहे की साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यात आणि जीव वाचविण्यात महाराष्ट्राने सर्वाधिक कामगिरी केली आहे.

या विश्लेषणातून असे स्पष्ट झाले आहे की देशाबाहेर आणि भारतातील राज्यांमध्ये  साथीच्या रोगाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यात कठोर लॉकडाउन प्रभावी ठरले आहे.

लॉकडाऊनमुळे पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 23.9 टक्के घसरण झाली. घसरण आणि सुधारणेचा दर इंग्रजी व्ही अक्षरा प्रमाणे राहिला कारण दुसऱ्या तिमाहीत  केवळ 7.5 टक्के घसरण झाली आणि सर्व महत्त्वाच्या आर्थिक निर्देशकांमध्ये देखील व्ही अक्षरा प्रमाणे पुनर्प्राप्ती दिसून आली आहे. ज्या राज्यात सुरुवातीपासून काटेकोरपणे नियमांचे पालन झाले तिथे वर्षभरात आर्थिक व्यवहार देखील वेगाने वाढले आहेत.  

या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर पुरवठा बाजूने संरचनात्मक सुधारणांचा अवलंब करणारा भारत हा एकमेव देश आहे. साथीच्या आजारामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने अर्थव्यवस्थेची उत्पादक क्षमता विस्कळीत केली, ज्यामुळे तातडीची मागणी पूर्ण होण्याकरिता अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्याची गरज निर्माण झाली कोणत्याही गैरसमजुतीमुळे स्थूल -आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ नये अशी खबरदारी घेतली गेली.


* * *

G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1693301) Visitor Counter : 313