गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्च्यातल्या हिंसेमध्ये जखमी झालेल्या दिल्लीच्या शूर पोलिस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन केली विचारपूस
Posted On:
28 JAN 2021 11:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021
प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्च्यातल्या हिंसेमध्ये जखमी झालेल्या दिल्लीच्या बहादूर पोलिस कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राजधानीतल्या सुश्रुत ट्रॉमा केंद्रामध्ये आणि तीर्थराम रूग्णालयात जावून भेट घेतली आणि जखमी पोलिस कर्मचा-यांची विचारपूस केली, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

एका ट्विटमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, ‘‘ आज दिल्लीच्या बहादूर पोलिस कर्मचाऱ्यांची रूग्णालयामध्ये भेट घेतली आणि त्यांना लवकर बरे वाटावे, अशी कामना केली. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारामध्ये त्यांनी दाखवलेला पराक्रम आणि संयम म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. त्याबद्दल संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतो.’’

गृहमंत्री अमित शहा यांनी जखमी पोलिस कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली.

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मेळाव्याच्यावेळी ऐतिहासिक लाल किल्ल्यासह दिल्लीतल्या अनेक स्थानावरून काढण्यात आलेल्या मोर्च्यांमध्ये सहभागी झालेल्या लोकांद्वारे हल्ले करण्यात आले आणि तोडफोडही करून पोलिस दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये दिल्ली पोलिस दलातले अनेक अधिकारी आणि जवान जखमी झाले होते.

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1693071)
Visitor Counter : 177