इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

एनआयसीएसआय 28 जानेवारी 2021 ला रौप्य महोत्सव साजरा करणार : केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे

Posted On: 27 JAN 2021 4:49PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय माहिती केंद्रा अंतर्गत नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर सर्विसेस इन्कोर्पोरेटेड, एनआयसीएसआय हा सार्वजनिक उपक्रम 28 जानेवारी 2021 ला स्थापनेची 25 वर्षे साजरी करणार आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  सचिव अजय साहनी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  अतिरिक्त सचिव डॉ  राजेंद्र कुमार, एनआयसीएसआयचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार मित्तल, यांच्यासह अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

तेजस या आभासी इंटेलिजन्स टूल, बुद्धिमत्ता साधनाचे रवी शंकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. डाटा मधून महत्वाची माहिती काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि सरकारी सेवांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना सेवा प्रदान करण्यासाठी, ई ऑक्शन इंडिया,वर्क फ्रॉम एनीव्हेअर पोर्टल साठी याचा उपयोग होणार आहे.

28 जानेवारी 2021 ला सकाळी 11.30 वाजता हा कार्यक्रम सुरु होणार असून एनआयसीच्या सोशल मिडिया मंचावर (वेबकास्ट लिंक:  https://webcast.gov.in/nicsi ) याचे लाईव्ह वेबकास्ट होणार आहे.

एनआयसीएसआयने आयसीटी सेवा उद्योगात 29 ऑगस्ट 1995 ला आपला प्रवास सुरु केला. केंद्र आणि राज्य सरकारांच्या तसेच भारतातल्या सार्वजनिक उपक्रमांना ई प्रशासन प्रकल्पासाठी पूर्णपणे माहिती तंत्रज्ञान सेवा आणि उपाय पुरवण्याबरोबरच एनआयसीएसआयने, आंतरराष्ट्रीय स्तरावरही विशिष्ट  प्रकल्पात आपली सेवा पुरवली आहे.

सरकारच्या बहुतांश ई प्रशासन प्रकल्पात एनआयसीएसआयचा मोठा सहभाग असून सामाजिक- आर्थिक विकासासह वाटचाल सुरु आहे.

माहिती तंत्रज्ञान सल्ला, डाटा एनलेटीक्ससाठी सर्वोत्कृष्टता केंद्र,आयसीटी प्रोडक्ट इन्स्टॉलेशनक्लाऊड सर्व्हिस, मनुष्यबळ प्रशिक्षण सेवा एनआयसीएसआय पुरवते.ई ऑफीस,ई वाहतूक,ई रुग्णालय, ई न्यायालये यासाठीही एनआयसीएसआय सेवा देऊ करते.

***

U.Ujgare/N.Chitale/P.Kor 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

U.Ujgare/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1692673) Visitor Counter : 259