सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री गडकरी यांचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विपणनाचे नवे मार्ग आणि निर्यात क्षमता यांचा शोध घेण्याचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2021 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की विपणनाचे नवे मार्ग आणि निर्यात क्षमतेचा अधिक शोध घेतला तर येत्या 5 वर्षांत भारताच्या एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचे योगदान सध्याच्या 30% वरून 40% पर्यंत वाढवता येऊ शकेल. ग्रामीण उद्योग क्षेत्रात वार्षिक 5 लाख कोटी रुपयांची उलाढाल गाठण्याची क्षमता आहे म्हणून या क्षेत्राचे सक्षमीकरण करून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण करता येतील.

गडकरी यांनी आज नवी दिल्ली परिसरातील कॅनॉट प्लेस इथे असलेल्या खादी भारतच्या मुख्य दुकानाला भेट दिली. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधील महिला कारागिरांनी तयार केलेल्या अनेक ग्रामोद्योग उत्पादनांचे उद्घाटन केले. गडकरी यांनी या दुकानामधील अनेक छोट्या स्टॉल्सना भेट दिली आणि खादी कारागीरांना उपजीविका देणाऱ्या विभिन्न उत्पादनांच्या निर्मितीसाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे कौतुक केले.
M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1692269)
आगंतुक पटल : 193