महिला आणि बालविकास मंत्रालय

देशात राष्ट्रीय बालिका दिन साजरा

Posted On: 24 JAN 2021 10:54PM by PIB Mumbai

 

देशात आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा झाला. दरवर्षी हा दिन 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिन  महिला  आणि बालविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने साजरा केला जाणारा उपक्रम  आहे.राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचा उद्देश देशातील मुलींना सर्व तऱ्हेचे  सहाय्य आणि संधी उपलब्ध करणे हा आहे. मुलींच्या हक्कांबाबत जनजागृती करणे आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व तसेच त्यांचे आरोग्य आणि पोषणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा देखील याचा हेतू आहे.

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त देशातील मुलींना अभिवादन केले आहे. एका ट्विटमधे श्री. मोदी म्हणाले,राष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी  आम्ही आमच्या # देश की बेटी आणि त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीला सलाम करतो.केंद्र सरकारने असे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत ज्याद्वारे शिक्षणाच्या संधीपर्यंत मुलींना  नेणे ,उत्तम आरोग्य सेवा आणि लिंगभेद विषयक जाणीव जागृती,    संवेदनशीलता वाढविणे अशा प्रकारे  मुलींचे  सबलीकरण करणेयाकडे लक्ष केंद्रित केले आहे. 

केंद्रीय महिला  आणि बालविकास मंत्री श्रीमती  स्मृती झुबिन  इराणी यांनी आपल्या ट्विट मधे म्हटले आहे ,राष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी आम्ही  प्रत्येक बालिकेला समान हक्क मिळवून देण्याच्या आणि त्यांना संधी मिळवून देण्याच्या प्रतिबध्दतेचा पुनर्रुच्चार करतो . चला. आपण आपल्या मुलींबद्दल अभिमान बाळगू या आणि देशातील मुलींचे महत्त्व जाणून घेण्यासाठी # 'देश की बेटीवापरत जनजागृती करु या.

भारत सरकारच्या शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास अशा  विविध मंत्रालयांनी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने  मुलींच्या प्रगती साठी आणि  सबलीकरणासाठी   विविध उपक्रम आणि कार्यक्रम हाती घेतले आहेत.

***

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1692036) Visitor Counter : 346