महिला आणि बालविकास मंत्रालय

32 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 प्रदान


पंतप्रधान उद्या या पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद

Posted On: 24 JAN 2021 8:49PM by PIB Mumbai

 

32 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 प्रदान करण्यात आले आहेत. भारत सरकार नवनिर्माणशैक्षणिक यशक्रीडा, कला आणि संस्कृती ,समाज सेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार प्रदान करते.

 

या पुरस्कारार्थी बालकांत 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 32 जिल्ह्यांतील मुलांचा समावेश  आहे. 7 पुरस्कार कला आणि संस्कृती क्षेत्रातील बालकांना, 9 पुरस्कार नवनिर्मिती क्षेत्रातील बालकांना, 5 बालकांना शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल पुरस्कार देण्यात आले आहेत. 7 बालकांना क्रीडा क्षेत्रात,3 बालकांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून एका बालकाला त्याच्या समाज सेवेच्या क्षेत्रातील प्रयत्नांसाठी सन्मानित करण्यात आले आहे.

या यश संपादन करणाऱ्या तरुण (लहान)मुलांचे कौतुक करताना भारताच्या सन्माननीय राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे मला आशा आहे की प्रधानमंत्री बाल पुरस्कार -2021 केवळ विजेत्यांनाच प्रेरणा देईल असे नव्हे तर इतर कोट्यवधी मुलांना स्वप्ने पहायला आकांक्षांनी प्रेरित व्हायला, तसेच आपल्या मर्यादा वाढवायला प्रेरणा देतील.  आपण सर्व जण आपल्यातील सर्वोत्तमाने देशाला यशाच्या नव्या  शिखरावर आणि समृध्दीकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या सर्व पुरस्कारार्थी बालकांशी व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.

 

पीएमआरबीपी पुरस्कारार्थींची यादी खालीलप्रमाणे:

S. No.

Name

State

Category

1

Ameya Lagudu

Andhra Pradesh

Art and Culture

2

Vyom Ahuja

Uttar Pradesh

Art and Culture

3

Hrudaya R Krishnan

Kerala

Art and Culture

4

Anurag Ramola

Uttarakhand

Art and Culture

5

Tanuj Samaddar

Assam

Art and Culture

6

Venish Keisham

Manipur

Art and Culture

7

Souhardya De

West Bengal

Art and Culture

8

Jyoti Kumari

Bihar

Bravery

9

Kunwar Divyansh Singh

Uttar Pradesh

Bravery

10

Kameshwar Jagannath Waghmare

Maharashtra

Bravery

11

Rakeshkrishna K

Karnataka

Innovation

12

Shreenabh Moujesh Agrawal

Maharashtra

Innovation

13

Veer Kashyap

Karnataka

Innovation

14

Namya Joshi

Punjab

Innovation

15

Archit Rahul Patil

Maharashtra

Innovation

16

Ayush Ranjan

Sikkim

Innovation

17

Hemesh Chadalavada

Telangana

Innovation

18

Chirag Bhansali

Uttar Pradesh

Innovation

19

Harmanjot Singh

Jammu And

Kashmir

Innovation

20

Mohd Shadab

Uttar Pradesh

Scholastic

21

Anand

Rajasthan

Scholastic

22

Anvesh Subham Pradhan

Odisha

Scholastic

23

Anuj Jain

Madhya Pradesh

Scholastic

24

Sonit Sisolekar

Maharashtra

Scholastic

25

Prasiddhi Singh

Tamil Nadu

Social Service

26

Savita Kumari

Jharkhand

Sports

27

Arshiya Das

Tripura

Sports

28

Palak Sharma

Madhya Pradesh

Sports

29

Mohammad Rafey

Uttar Pradesh

Sports

30

Kaamya Karthikeyan

Maharashtra

Sports

31

Khushi Chirag Patel

Gujarat

Sports

32

Mantra Jitendra Harkhani

Gujarat

Sports

 

 

***

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1692001) Visitor Counter : 403