माहिती आणि प्रसारण मंत्रालय
शैशवातून पौगंडावस्थेपर्यंतच्या काळात आपल्याकडून होणाऱ्या अनेक क्रिया या जाणीवपूर्वक न घडता नकळत होत असतात: इफ्फी 51 मधील नॉन फिचर फिल्म ‘कॅटडॉग’ च्या दिग्दर्शक अश्मिता गुहा नेओगी यांचे मत
शैशवातून पौगंडावस्थेपर्यंतच्या काळात आपल्याकडून होणाऱ्या अनेक क्रिया या जाणीवपूर्वक न घडता नकळत होत असतात. एखादी गोष्ट एखाद्या मुलाला गुंतवून ठेवते ज्याची त्याला किंवा तिला कदाचित जाणीव नसते परंतु नंतरच्या काही वर्षांत त्याचा अन्वयार्थ त्यांना लागू शकतो इफ्फी 51 भारतीय पॅनोरमामधील नॉन फिचर फिल्म ‘कॅटडॉग’ मध्ये हीच संकल्पना उद्धृत केली असल्याचे दिग्दर्शक अश्मिता गुहा नेओगी यांनी सांगितले.
शनिवारी (23 जानेवारी, 2021) गोव्यातील 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (आयएफएफआय) हा चित्रपट दाखवण्यात आला आहे.
“पौगंडावस्थेचा काळ म्हणजे “ ज्ञात आणि अज्ञाताचे जग आहे ” असे नेओगी यांनी आज गोव्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. “उमजणाऱ्या आणि न उमजणाऱ्या गोष्टींची सरमिसळ होण्याचा हा काळ आहे. भावा-बहिणीच्या नातेसंबंधातून ही कल्पना आम्ही चित्रपटात मांडली आहे.
एका भावा-बहिणीने त्यांच्यासाठी वेळ न देणाऱ्या त्यांच्या शिक्षक आणि आईच्या नकळत त्यांचे स्वतःचे काल्पनिक विश्व निर्माण केले आहे. पूर्व-पौगंडावस्थेतील बदल आणि घरातील वेगवान घडामोडी यातील हिंदोळ्यात ही भावंडे परस्परांना साथ देतात. ही भावंडे त्यांच्या सभोवतालच्या गोष्टी आणि स्वतःमधील शारीरिक बदल समजून घेण्याचा कसा प्रयत्न करतात त्याचे चित्रण या कथानकात केले आहे. अखेरीस जेव्हा आईला त्यांच्या या जगाची कल्पना येते तेव्हा त्यांचे जग कोसळण्याच्या धोका असतो. ते दोघे एकतर शरण येऊ शकतात किंवा प्रतिकार करू शकतात.
चित्रपटाचे नाव हे एका कार्टूनवर आधारित आहे ज्यात धडाच्या एका टोकाला मांजरीचा चेहरा होता तर दुसर्या टोकाला कुत्र्यासारखा चेहरा होता. “चित्रपटात, मी असे दर्शविण्याचा प्रयत्न केला की दोन भिन्न घटक परस्परात एकरूप झाले आहेत.”
इंडियन पॅनोरमा नॉन फिचर फिल्म ‘कॅटडॉग’ ची निर्मिती फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एफटीआयआय) केली आहे. एफटीआयआय पदवी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दिग्दर्शकाने हा चित्रपट तयार केला आहे.
***
Jaydevi PS/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691848)
Visitor Counter : 202