माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘ओट्टो द बार्बरीयन’ –चित्रपट अशा मनोविकारांवर भाष्य करतो, ज्यांच्याशी कसा सामना करायचा हे समाजाला माहित नाही” दिग्दर्शिका रुझान्द्रा गीटेस्कू

पणजी, 23 जानेवारी 2021


“ओट्टोला दिवसातून अनेकदा आपल्या दुःखाचा सामना करावा लागत असे, त्याच्या प्रेयसीच्या आत्महत्येबद्दल त्याच्या असलेल्या जबाबदारीची जाणीव त्याला अधिकच दुःखी करत असे.” आपल्या कथेतून, “ओट्टो द बार्बरीयन” चित्रपट अशा मानसिक आजारांवर भाष्य करतो, ज्यांचा सामना कसा करायचा, हे समाजाला अद्याप माहित नाही. हे मानसिक आजार ओळखताच येत नाहीत. या चित्रपटाचा उद्देश असे मानसिक आजार, जसे की निराशा, याबाबत जागृती करणे हा आहे.  त्याही पलीकडे, मला आणखी एका गोष्टीवर भर द्यावासा वाटतो, ती म्हणजे सह अनुभूती- अशा लोकांविषयी ज्यांना कधीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आत्महत्येचे दुःख सहन करावे लागते, त्यांचे दुःख आणि निराशा आपण समजून घ्यायला हवी.” अशा शब्दात “ओट्टो द बार्बरीयन” चित्रपटाच्या दिग्दर्शिका  रुझान्द्रा गीटेस्कू यांनी आपल्या चित्रपटाविषयी माहिती दिली. गोव्यात सुरु असलेल्या 51 व्या इफ्फीमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. किशोरवयात मुलांना सामोरे जावे लागणाऱ्या मानसिक ताणतणावांचा मुलांच्या मनोविश्वावर  होणार परिणाम या चित्रपटात अत्यंत संवेदनशीलतेने मांडण्यात आला आहे. या रोमानियन चित्रपटाचा प्रीमियर शो काल इफ्फिमध्ये झाला.

चित्रपटाचा नायक ओट्टो 17 वर्षांचा किशोरवयीन मुलगा आहे, त्यांची प्रेयसी लौराने आत्महत्या केल्यामुळे तो निराश झाला आहे. त्यानंतर, तिच्या आत्महत्येच्या तपासाशी संबंधित माहिती मिळवताना तो मदत करतो. मात्र, त्या दरम्यान त्याचे पालक, आजोबा आणि लौराची आई यांनी तयार केलेल्या एका दुष्टचक्रात तो अडकत जातो. व्हिडीओ रेकोर्डिंगच्या माध्यमातून लौरा आजही त्याच्या आयुष्यात आहे.तिच्याबाबतीत नेमके काय झाले हे जाणून घेण्यासाठी तो वारंवार तिचे व्हिडीओ एडीट करतो, ऐकत बसतो. या संपूर्ण प्रक्रीयेदरम्यान, लौराच्या बाबतीत जे काही दुःखद घडले असते, त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्याच खाद्यांवर येऊन पडते.

ओट्टो सारखी माणसे, ज्यांच्या जीवलगांनी आत्महत्या केल्यामुळे जी एकटी पडली आहेत, त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या दुःखांविषयी संवाद व्हावा, चर्चा व्हावी, असा या चित्रपटाचा उद्देश आहे, असे दिग्दर्शिकेने सांगितले.

दुःख, काहीतरी गमावल्याची भावना, आत्महत्या आणि हत्या यांसारख्या विषयांवरील चित्रपट अनेकदा अत्यंत भडक आणि नाट्यमय असतात, असे मला वाटते. या पार्श्वभूमीवर, माझ्या चित्रपटात अजिबात नाट्यमयता नाही. “आम्हाला आमच्या नकारात्मक चित्रपटात एक न-नायक साकारायचा होता, ज्याद्वारे त्याचे दुःख अगदी खऱ्या, भलेही कुरूप स्वरूपात प्रेक्षकांसमोर येईल, आणि तेच परिणामकारक ठरेल.” असे मत त्यांनी व्यक्त केले.

गीटेस्कू या रोमानियन कलाकार आणि चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांचा ‘ओट्टो द बार्बरीयन’ चित्रपट सर्जेओ फिल्म फियेस्ता, सिनेफेस्ट सेन्ट्रल आणि इस्टर्न युरोपियन फेस्टिवल साठीही निवडला गेला आहे.

 


* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691724) Visitor Counter : 220