पर्यटन मंत्रालय

पर्यटन मंत्रालयाकडून "21व्या शतकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची समर्पकता" या विषयावर "देखो अपना देश" मालिकेअंतर्गत पर्यटन मंत्रालयाकडून वेबीनार आयोजित

Posted On: 23 JAN 2021 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2021


पर्यटन मंत्रालयाच्या 'देखो अपना देश# अंतर्गत वेबीनार मालिकेने 22 जानेवारी 2021 ला "21व्या शतकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची समर्पकता" या विषयावर 73वा वेबीनार आयोजित केला होता. ओपन प्लॅटफॉर्म फॉर नेताजी'चे प्रवक्ते आणि संयोजक चंद्रकुमार बोस यांनी हे वेबीनार प्रस्तुत केले.

चंद्रकुमार बोस यांनी अनेक सामाजिक मुद्द्यांवर कार्य केले आहे तसेच भारतात मानवाधिकारांबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करणाऱ्या इंडियन सोशालिस्ट डेमोक्रेटिक फोरम (आईएसडीएफ) सोबत ते जोडलेले आहेत. कोलकात्याच्या बाहेर लंडनवरून कार्यान्वित होत असलेल्या नेताजी सुभाष फाउंडेशनशीही  ( एनएसएफ) ते संबंधित आहेत.  एनएसएफ ही संशोधन संस्था आझाद हिंद सेना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची गाथा प्रसारित करत आहे.  

देश 23 जानेवारी 2021 ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करत आहे. सरकारने प्रत्येक वर्षी हा दिवस 'पराक्रम दिवस' या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 जानेवारीला आयोजित या वेबीनारमध्ये नेताजींना अभिवादन  आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातले त्यांचे योगदान यावर चर्चा करण्यात आली.

इंग्रज शासन, शोषण आणि दडपशाहीतून भारताला मुक्त करून एकसंध आणि प्रगतीशील भारतासाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आघाडीवर भारताच्या सर्वांगीण विकासावर भर देणे हेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे तत्वज्ञान, विचारधारा आणि दृष्टिकोन होता.

देखो अपना देश वेबीनार मालिका इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स विभागामार्फत तांत्रिक भागीदारीतून आयोजित करण्यात येते.

वेबीनारची सत्रे आता https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured यासह भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सगळ्या सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध आहेत.

 
* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691664) Visitor Counter : 93