मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

देशातील एव्हीयन एन्फ्लुएन्झाची (बर्ड फ्ल्यू) स्थिती

Posted On: 23 JAN 2021 6:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2021


23 जानेवारी 2021 पर्यंत, 9 राज्यात (केरळ, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ, उत्तराखंड, गुजरात, उत्तरप्रदेश आणि पंजाब) एव्हियन एनफ्लूएन्झाची पुष्टी झाली आहे तसेच कावळा/स्थलांतरीत/वन्य पक्षांसंदर्भात  12 राज्यात (मध्य प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, गुजरात ,उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब) बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला आहे.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आणि केरळमध्ये प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात  नियंत्रण आणि प्रतिबंध कार्यान्वयन (स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण) सुरू आहे. कृती आराखड्यानुसार, ज्या शेतकऱ्यांच्या कोंबड्या, अंडी आणि कुक्कुट खाद्य जप्त आणि नष्ट करण्यात आले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय (डीएएचडी) विभागाकडून एलएच आणि डीसी (पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण योजना) अंतर्गत 50:50 भागीदारीच्या आधारावर (प्राणीरोग नियंत्रण मदत) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निधी पुरवला जातो.

एव्हीयन इन्फ्लुएन्झा (बर्ड फ्ल्यू) च्या नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी, सुधारित कृती आराखड्यावर आधारित  करत असलेल्या उपायोजनांनासंदर्भात सर्व राज्ये विभागाला रोज अहवाल सादर करत असतात .

ट्विटर, फेसबुक  यांसारख्या समाजमाध्यमांद्वारे, बर्ड फ्ल्यू बाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने विभागाकडून निरंतर प्रयत्न सुरू आहेत.

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691637) Visitor Counter : 83