माहिती आणि प्रसारण मंत्रालय

समाजाला परत देण्याची संस्कृती मिळवण्यापेक्षा जास्त आनंद देते : प्रकाश जावडेकर

Posted On: 23 JAN 2021 2:45PM by PIB Mumbai

मुंबई, 23 जानेवारी 2021

 

समाजाला परत देण्याची संस्कृती ही मिळवण्याच्या संस्कृती पेक्षा जास्त आनंद देते, असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल, माहिती व प्रसारण, आणि  अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. ते कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सायरस पूनावाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच डॉ. सायरस पूनावाला कौशल विकास केंद्राचे (स्कील डेव्हलपमेंट सेंटर, CDC ) नामकरण करताना बोलत होते. 

मंत्री पुढे म्हणाले की कॅम्प एज्युकेशन सोसायटीला 136 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे आणि या संस्थेला सतरा वर्षांसाठी प्रल्हाद अत्रे यांचे नेतृत्व लाभले.

प्रकाश जावडेकर यांनी यावेळी पूनावाला ग्रुपच्या दातृत्वाचा गौरव केला आणि उद्योग जगताने समाजाला परतफेड शक्य व्हावी म्हणून खूप उत्पन्न मिळवत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.

कोरोना लस उत्पादनामध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटचा गौरव करताना मंत्री म्हणाले की एका जबाबदार नेतृत्त्वाच्या अनुषंगाने भारत हा मालदीव, भूतान, बांगलादेश, ब्राझील अशा बारा देशांना कोरोना लस पुरवत आहे व निर्णय झाल्यानंतर इतर देशांना देखील भारत कोरोना लस पुरवेल.

हे आदरणीय पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाप्रती टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे असे मत केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी, केंद्रीय शिक्षण मंत्री असताना सुरु केलेल्या हॅकेथॉनची यावेळी मंत्र्यांनी आठवण केली तसेच संशोधन संस्था आणि विद्यापीठांची सांगड घालण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा देखील त्यांनी उल्लेख केला

शिक्षण संस्थेला मदतीचा चेक दिल्यानंतर डॉक्टर सायरस पूनावाला म्हणाले की कॅम्प एज्युकेशन सोसायटीशी असलेल्या संबंधांबाबत ते आनंदी आहेत आणि आणि शिक्षण क्षेत्रामध्ये करत असलेल्या मदतीचा त्यांना अभिमान आहे कारण ते एका मजबूत भविष्याचा पाया आहे.  भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्राशी आणखी जोडले जाण्याची अपेक्षा श्री पूनावाला यांनी यावेळी व्यक्त केली.

त्याअगोदर मंत्र्यांनी डॉ. सायरस पुनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधील सुविधांचा आढावा घेतला.

* * *

R.Tidke/M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1691544) Visitor Counter : 22