विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

नवोन्मेश आणि वैज्ञानिक संशोधन विषयक प्रकाशन या दोन्हीमध्ये जागतिक स्तरावर भारताची कामगिरी उंचावली


कल्पनांचे वापरायोग्य तंत्रज्ञानात रुपांतर आणि त्याचा देशभरात मोठ्या प्रमाणात उपयोग करण्याच्या चळवळीचा देशभर प्रसार

Posted On: 22 JAN 2021 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021

विज्ञान क्षेत्रातले भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी आता नवोन्मेशी अर्थव्यवस्थेशी जोडली जाऊ लागली आहे.

वैज्ञानिक संशोधनविषयक प्रकाशनात देशाने तिसरे स्थान प्राप्त केले आहे, आता जागतिक नवोन्मेश निर्देशांकानुसार जागतिक स्तरावरच्या नवोन्मेशी अर्थव्यवस्थांमध्ये पहिल्या 50 मधेही भारताने स्थान प्राप्त केले आहे. अनेक विकसित आणि विकसनशील देशानाही भारताने मागे टाकले आहे.

संशोधन आणि विकास क्षेत्रात भारताच्या राष्ट्रीय गुंतवणुकीत 2017-18 मधल्या 1,13,825.03 कोटी रुपयांवरून वाढ होऊन 2018-19 मध्ये ती 1,23,847.71 कोटी रुपये झाली. त्याच बरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या  निधी  सारख्या उपक्रमांनीही हे स्थान प्राप्त करण्यात महत्वाची भूमिका बजावली. निधीच्या अंमलबजावणीमुळे 3681 स्टार्ट अपची जोपासना झाली यातून 1992 बौद्धिक संपदेची निर्मिती झाली.  या माध्यमातून गेल्या पाच वर्षात थेट रोजगाराच्या स्वरुपात 65,864 रोजगाराची आणि 27,262  कोटी रुपयांच्या  आर्थिक संपदेची निर्मिती झाली. 

कल्पनांचे वापरायोग्य तंत्रज्ञानात रुपांतर आणि त्याचा देशभरात  मोठ्या प्रमाणात उपयोग   करण्याच्या चळवळीचा देशभर प्रसार सुरु झाला आहे. 2017-18 या वर्षात  13,045 पेटंटना मंजुरी देण्यात आली त्यात  1,937 भारतीय पेटंटचा  समावेश होता. 2017- 18 या वर्षात भारतीय पेटंट कार्यालयात दाखल झालेल्या पेटंट मध्ये काही राज्यांचा सिंहाचा वाटा होता.  दाखल 65 % पेटंट     महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांमधली होती. 

गेल्या 10 वर्षात विज्ञान  संशोधनविषयक प्रकाशनात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या एजन्सीच्या आकडेवारी नुसार भारताचे नॅशनल  सायन्स फौंडेशन तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2018 मध्ये 1,35,788 वैज्ञानिक लेख प्रकाशित करण्यात आले. वैज्ञानिक प्रकाशनात भारतात  12.9  वाढ झाली आहे तर जागतिक सरासरी 4.9 आहे. भारतात 2008  ते 2018  या काळात प्रकाशन वार्षिक वृद्धी दर 10.73 टक्के असा सर्वात वेगवान दर  राहिला.

 

Jaydevi P.S/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691410) Visitor Counter : 189