विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

राज्य स्तरावर संशोधक जाळे विकसित करण्याबरोबरच केंद्र-राज्य सहकार्य दृढ करण्याची आवश्यकता तज्ञांकडून अधोरेखित

Posted On: 22 JAN 2021 1:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021

केंद्र-राज्य सहकार्य, राज्य स्तरावर संशोधक जाळे विकसित करत ते राष्ट्रीय स्तराशी संलग्न करणे, तंत्रज्ञान दृष्ट्या मागास भागात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे आणि आंतर संस्थात्मक सहकार्याची आवश्यकता तज्ञांनी अधोरेखित केली आहे. 5 व्या राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेश धोरणाच्या (एसटीआयपी) 21 जानेवारी 2021 ला आयोजित केलेल्या पहिल्या मसुद्यानंतरच्या सल्लामसलत बैठकीत तज्ञांनी हे मत व्यक्त केले आहे.

यामध्ये विचारवंत, सरकारी प्रतिनिधी, उद्योग,शिक्षण क्षेत्रातले उत्तर भारतातले प्रतिनिधी सहभागी झाले  होते. या चर्चेतून पुढे आलेल्या सूचना, प्रतिसाद मोलाचा असून एसटीआयपी मसुदा सुधारित करताना विचारात घेतला जाईल, असे एसटीआयपी सचिवालयाचे प्रमुख अखिलेश गुप्ता यांनी सांगितले.

डाटा संबंधित केंद्रीय भांडार म्हणून राष्ट्रीय एसटीआय वेधशाळा, सार्वजनिक निधी पुरस्कृत संशोधनाशी निगडीत माहिती पुरवणारे समर्पित पोर्टल,वाब वन नेशन वन सबस्क्रीप्शन, देशाच्या ग्रामीण भागातल्या समस्यांवर तोडगा देण्यावर लक्ष केंद्रित करणारे संशोधन, तळापर्यंतच्या संशोधकांना सहाय्य, राष्ट्रीय धोरण संशोधन संस्था यासारख्या शिफारसी एसटीआयपी कडून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सचिवालयाने चर्चेच्या 300 सत्रातून देश आणि विदेशातल्या 43,000 संबंधीतांबरोबर व्यापक चर्चा केली आहे. 31 डिसेंबर 2020 ला एसटीआयपी, सार्वजनिक चर्चा आणि सूचनेसाठी जारी करण्यात आले. तेव्हापासून सूचना आणि शिफारसी मागवण्यासाठी अनेक चर्चा सुरु करण्यात आल्या आहेत. गेले 2 आठवडे चर्चेची मालिका आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक जनतेच्या गरजा आणि संशोधन आणि विकास उद्योग यांची सांगड घालण्याच्या गरजेकडे लक्ष देण्याची गरज पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक राज कुमार यांनी व्यक्त केली.

एसटीआयपी सचिवालय, आणि पंजाब विद्यापीठाच्या धोरण संशोधन डीएसटी केंद्र यांनी india-stip[at]gov[dot]in या ई मेलवर 31 जानेवारी 2021 पर्यंत सार्वजनिक प्रतिसाद मागवला आहे. 

 

U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691180) Visitor Counter : 111