कोळसा मंत्रालय

कोल इंडियाच्या एनसीएल, सीसीएल, आणि डब्ल्यूसीएल या कंपन्यांना 'कोळसा मंत्री 2020 पुरस्कार' प्रदान


केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी कोल इंडिया लिमिटेडच्या 'प्रोजेक्ट पॅशनचे' केले उदघाटन

Posted On: 21 JAN 2021 6:52PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कोळसा आणि खाण उद्योग मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोल इंडिया लिमिटेडच्या, नर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL), सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड (CCL) आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) या तीन कोळसा कंपन्यांना आज नवी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात कोळसा मंत्री पुरस्कार प्रदान केले. देशात कोळसा उत्खननामधील उत्कृष्ट आणि शाश्वत पध्दतींना चालना देण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. केंद्रीय मंत्री जोशी यांनी यावेळी कोल इंडिया लिमिटेडच्या प्रोजेक्ट पॅशन या उपक्रमाचे देखील उद्घाटन केले. यामुळे कंपनीच्या व्यवसायातील कार्यक्षमता आणि विकासात वृध्दी होईल.

एनसीएलला कोळसा उत्पादन आणि उत्पादकता यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तर सीसीएल आणि डब्ल्यूसीएल यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट सुरक्षा पध्दती आणि शाश्वत उत्खनन याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कोळसा उत्पादन क्षेत्रात सुरक्षितता आणि शाश्वतीची काळजी घेऊन आत्मनिर्भर होण्याचे भारताचे लक्ष्य आहे. अशा मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांचा आरंभ करण्यात आला आहे. मी विजेत्यांचे अभिनंदन करतो आणि आगामी काळात कंपन्या आपला दर्जा उंचावत अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि शाश्वत उत्खनन कार्य करीत जातील अशी आशा करतो, असे जोशी यावेळी म्हणाले.

कोल इंडिया कंपनीमध्ये ई आर पी अर्थात एन्टरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग ची अंमलबजावणी दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सीआयएल मुख्यालयातील कार्य आणि तिच्या दोन सहाय्यक कंपन्या डब्ल्यूसीएल आणि एमसीएल यातील कामांचा समावेश आहे.

ईआरपीच्या अंमलबजावणीमुळे सीआयएला वेळेवर निर्णय  घेणे, कार्यक्षमता सुधारणे आणि खर्च कमी करणे याकामी मदत होईल. त्यामुळे आर्थिक वर्ष 23-24 पर्यंत एक अब्ज कोळशाचे उत्पादन साध्य करण्यासाठी सीआयएलला सामर्थ्य मिळेल, असे जोशी म्हणाले. मंत्रीमहोदयांनी एनसीएलच्या कृष्णशीला कोळसा प्रकल्पाच्या सीएचपी अर्थात नव्या कोळसा हाताळणी प्रकल्पाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उदघाटन केले.

कृष्णशीला सीएचपी हा सीआयएलच्या 35 फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी (FMC) प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याची क्षमता 400 एमटीपीए असून तो 23-24 या आर्थिक वर्षापर्यंत बारा हजार पाचशे कोटींच्या गुंतवणूकीसह पूर्ण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे

S.Tupe/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690953) Visitor Counter : 139