उपराष्ट्रपती कार्यालय
जागतिक वस्त्रोद्योग आणि तयार कपडा बाजारपेठ काबीज करण्यासाठी कामगारांचे कौशल्य अधिक विकसित करा तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करा : उपराष्ट्रपती
अर्थव्यवस्था आणि महिलांच्या रोजगारासाठी वस्त्रोद्योगाच्या महत्त्वाचा: उपराष्ट्रपतींनी केला पुनरुच्चार
अॅपरल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या आभासी व्यासपीठाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
21 JAN 2021 6:21PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज वस्त्रोद्योग क्षेत्राचे अद्ययावतीकरण, या उद्योगातील कामगारांन अतिरिक्त कौशल्य शिकविण्याचे तसेच निर्यात क्षेत्रातील स्पर्धात्मकतेला सामोरे जाण्याचे आणि जागतिक बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
आमच्याकडे मुबलक प्रमाणात कच्चा माल आणि मनुष्यबळ असून देखील छोट्या-छोट्या कंपन्या आणि कालबाह्य तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपण जागतिक वस्त्रोद्योग निर्यातीत मागे पडलो आहोत असे ते म्हणाले. अॅपरल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (एईपीसी) च्या वस्त्रोद्योग उत्पादनांचे आभासी मंचावर उद्घाटन करताना ते म्हणाले, “जोपर्यंत वस्त्रोद्योग कंपनीचा आकार वाढत नाही, नवीन तंत्रज्ञानाच अवलंब केला नाही आणि कुशल मनुष्यबळ नसल्यास आपण दर्जेदार वस्तू तयार करू शकत नाही आणि त्या स्पर्धात्मक किंमतीवर निर्यात करू शकत नाही.
लघुउद्योगांना चालना देणारी उत्कृष्ट योजना म्हणून सुधारित तंत्रज्ञान श्रेणीसुधार निधी योजनेचे (एटीयूएफएस) कौतुक करताना ते म्हणाले, या योजनेचा लाभ द्वितीय व तृतीय श्रेणी शहरे आणि ग्रामीण भागातील कंपन्यांपर्यंत पोचविण्यासाठी ठोस प्रयत्न केले पाहिजेत. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी राबविलेल्या उपक्रमांबद्दल नायडू यांनी त्यांचे कौतुक केले.
जागतिक वस्त्रोद्योग निर्यातीत भारताचा वाटा केवळ 6 टक्के असल्याचे लक्षात आणून देत उपराष्ट्रपती म्हणाले की लघु उद्योगांना आवश्यक ती मदत करण्याची गरज असून जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या उद्योगाची गुणवत्ता वृद्धिंगत करून त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. निर्यातीला चालना देण्यासाठी मेगा टेक्सटाईल फर्म स्थापन करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाबरोबर काम करण्याच्या निती आयोगाच्या योजनेचे त्यांनी कौतुक केले.
उपराष्ट्रपतींनी कापड उद्योजकांना बदलत्या जागतिक मागणीनुसार त्यांच्या उत्पादनांमध्ये विविधता आणण्याचे आणि नवीन बाजारपेठ काबीज करण्याचे आवाहन केले. अर्थव्यवस्थेमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या भूमिकेचा उल्लेख करताना नायडू यांनी हे क्षेत्र रोजगार निर्माण करणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र असून या क्षेत्रात सुमारे 45 दशलक्ष लोकांना थेट रोजगार उपलब्ध होतो. ते म्हणाले की, भारतातील वाढत्या तरुण लोकसंख्येचा उपयोग करून घेण्यासाठी हे क्षेत्र मोठी भूमिका बजावू शकते असे ते म्हणाले . वस्त्रोद्योग क्षेत्रात महिला कामगारांच्या वाढत्या संख्येचा संदर्भ देऊन त्यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राला महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाद्वारे दुर्गम भागातील सामाजिक परिवर्तनाचे वाहक असल्याचे संबोधिले. “देशातील एकूण प्रतिभेपैकी 50 टक्के प्रतिभा आमच्या महिलांची आहे. जर त्यांना योग्य प्रोत्साहन आणि प्रशिक्षण दिले गेले तर त्या उत्कृष्ट कार्य करू शकतील”, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.
‘तांत्रिक वस्त्रोद्योग’ क्षेत्र हे नव्याने उदयाला येणारे क्षेत्र असून यात अगणित संधी असल्याचे नमूद करत त्यांनी वर्ष 2022 पर्यंत 220 अब्ज अमेरिकन डॉलरची विस्तारित जागतिक बाजारपेठ होणाऱ्या या क्षेत्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
महामारीच्या कालावधीत एईपीसी आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाने वैद्यकीय वस्त्रोद्योग (पीपीई किट्स, फेस शिल्ड्स, मास्क आणि ग्लोव्हज) चे उत्पादन व निर्यातीस प्रोत्साहन दिल्याबदल नायडू यांनी त्यांचे कौतुक केले. या एकत्रित प्रयत्नांमुळेच भारत आज पीपीई किट्सच्या निर्मितीमध्ये आणि निर्यातीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे नायडू म्हणाले.
या आभासी कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबीन इराणी, एईपीसी चे अध्यक्ष डॉ. ए. साकथीवेल तसेच वस्त्र निर्यातक आणि उद्योजक उपस्थित होते.
उपराष्ट्रपतींच्या संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा.
Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690933)
Visitor Counter : 183