श्रम आणि रोजगार मंत्रालय
नोव्हेंबर 2020 च्या पेरोल डेटामध्ये ईपीएफओने 10.11 लाख ग्राहकांची भर घातली
Posted On:
20 JAN 2021 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2021
आज प्रसिद्ध करण्यात्य आलेल्या ईपीएफओच्या अस्थायी वेतनपटानुसार (पेरोल), नोव्हेंबर 2020 मध्ये आणखी सुमारे 10.11 लाख नोंदणीधारक सहभागी झाल्याचे आढळून आले आहे. कोविड-19 महामारी असूनही, चालू आर्थिक वर्षात (एप्रिल ते नोव्हेंबर 2020 पर्यंत) सुमारे 45.29 लाख नवीन सदस्यांची भर पडली आहे. प्रकाशित केलेल्या आकडेवारीत या महिन्यात सामील झालेल्या आणि ज्यांचे योगदान प्राप्त झाले आहे अशा सदस्यांचा समावेश आहे.
नोव्हेंबर 2020 मध्ये सुमारे 6.41 लाख नवीन सदस्य ईपीएफओमध्ये सामील झाले. अंदाजे 3.70 लाख सदस्य बाहेर पडले आणि मग ते पुन्हा ईपीएफओमध्ये सामील झाले. ईपीएफओशी संलग्न आस्थापनांमध्ये ग्राहकांनी नोकरी बदलल्याचे यातून दिसून येते आणि अंतिम सेटलमेंटचा पर्याय निवडण्याऐवजी निधी हस्तांतरित करून सदस्यत्व कायम ठेवण्याचा पर्याय त्यांनी निवडला आहे. बाहेर पडलेले सदस्य पुन्हा सामील होतात यातून हे देखील सूचित होते की भारतात सक्रिय कोविड -19 रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे कामगार पुन्हा आपल्या नोकरीकडे वळत आहेत.
वय-निहाय विश्लेषण असे दर्शविते की नोव्हेंबर 2020 मध्ये, 22-25 वयोगटातील सदस्य संख्येमध्ये जवळपास 2.72 लाख इतकी नोंदणी झाली आहे. त्यानंतर 18-21 वयोगटात सुमारे 2.21 लाख नोंदणी झाली. 18-25 वयोगटातील सदस्य कामगार बाजारपेठेत नवीन असून नोव्हेंबर, 2020 मध्ये नवीन सदस्यांपैकी त्यांचे प्रमाण अंदाजे 48.72% आहे.
राज्यांच्या वेतनपटाच्या आकडेवारीच्या तुलनेत महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा चालू आर्थिक वर्षात एकूण वेतनपट वाढीमध्ये 53% इतका वाटा असून सर्व वयोगटात रोजगार सुधारण्याच्या बाबतीत आघाडीवर आहेत.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690596)
Visitor Counter : 146