माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रमोद पती यांना फिल्म डिव्हिजनने वाहिली श्रध्दांजली

Posted On: 20 JAN 2021 7:36PM by PIB Mumbai

पणजी, 20 जानेवारी 2021

 

सुप्रसिद्ध माहितीपट आणि अँनिमेशन चित्रपट निर्माते प्रमोद पती (15 जानेवारी1932 - 20 जानेवारी 1975) ज्यांना भारतीय नवप्रवाहाच्या चित्रपटांचे जनक म्हणून मानले जाते त्यांना दिनांक 20 जानेवारी 2021 रोजी त्यांचे निवडक चित्रपट प्रदर्शित करून आणि त्यांच्या वरील मौखिक ऐतिहासिक चित्रपट सादर करून फिल्म्स डिव्हिजनने वाहिली श्रध्दांजली वाहिली. फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळावर आणि यू ट्यूब वाहिनीवर दिवसभर त्यांचे चित्रपट एकामागोमाग एक दाखविले जात आहेत.

आबिद(5 मिनिटे/संगीत/रंगीत/1972)ज्या माहितीपटात आबिद यांची कला पाॅप शैलीत सादर केली आहे, कलक्सपोसिऑन(2मिनिटे/ संगीत /कृष्ण धवल/1968)जी कुटुंब नियोजन यावरील छोटी प्रायोगिक चित्रफीत आणि ट्रीप (5 मिनिटे/संगीत/कृष्ण धवल/ 1970). ज्यात जीवनातील स्थित्यंतरे दाखविली आहेत, एक्स्प्लोरर (7मिनिटे/संगीत/कृष्ण धवल/ 1968),जी युवा मोहीम यावर आहे आणि ओरल हिस्ट्री ऑफ प्रमोद पती -3( 90मिनिटे/हिंदी आणि इंग्रजी /रंगीत/2017 संतोष गौर) जी फिल्म्स डिव्हिजनच्या या चित्रपट निर्मात्यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित आहे,  जे आपल्या चित्रपट निर्मितीतील  वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखले जात. 

कृपया हे चित्रपट पाहाण्यासाठी https://filmsdivision.org/  या संकेतस्थळाला भेट द्या, आणि @ “Documentary of the Week” वर क्लिक करा  आणि चित्रपट पहाण्यासाठी   फिल्म्स डिव्हिजनचे https://www.youtube.com/user/FilmsDivision चे अनुसरण करा


* * *

S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1690518) Visitor Counter : 179


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi