माहिती आणि प्रसारण मंत्रालय

या कठीण परिस्थितीमध्ये समर रिबेल्स अनेक कुटुंबांना नैतिक आधार देईल अशी आशा आहे: दिग्दर्शक मार्टिना साकोवा “चित्रपट मैत्री, विश्वास, आपुलकी आणि प्रेमास प्रोत्साहन देतो”

Posted On: 20 JAN 2021 6:52PM by PIB Mumbai

पणजी, 20 जानेवारी 2021


एक 11 वर्षाचा मुलगा आपल्या आईला विरोध करत आपल्या आजोबांचा शोध घेण्यासाठी जर्मनीतील आपल्या घरातून स्लोवाकीया येथे पळून जातो परंत आपण कल्पना केल्याप्रमाणे आपल्या आजोबांचा स्वभाव हा मैत्रीपूर्ण नसल्याचे त्याच्या लक्षात येते.

या मुलाच्या रोमांचक प्रवासाविषयी51 व्या इफ्फीमधील वर्ल्ड पॅनोरामा विभागात प्रदर्शित झालेल्या समर रिबेल या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मार्टिन साकोवा म्हणाल्या, “एका 11 वर्षाच्या मुलाच्या नजरेतून ही कथा सांगितली जाते. या कठीण परिस्थितीमध्ये ही कथा अनेक कुटुंबांना नैतिक आधार देईल अशी मला आशा आहे. मैत्री, विश्वास आणि आपुलकी आणि प्रेम भावना हा या चित्रपटाचा आशय आहे. चित्रपटातील भावना प्रेक्षकांना समजतील आणि या चित्रपटातील विशेष विनोद त्यांना चांगले वाटतील." 51 व्या इफ्फी मध्ये आज पाचव्या दिवशी (20 जानेवारी 2021) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

“माझ्या लहानपणी देखील मी विभक्त कुटुंबाच्या समस्येचा सामना केला होता, परंतु माझ्या आजोबांसोबत माझे बालपण खूप चांगले गेले,” अशी कबुली दिग्दर्शिकेने यावेळी दिली. जोनासची भूमिका साकारणारा एलीचा व्हिसकोसिल हा बालकलाकार एक उत्स्फूर्त आणि हुशार अभिनेता आहे, त्याने या भूमिकेच्या मागणीनुसार अभिनय केला असून तो नवीन काहीतरी करण्यासाठी नेहमी तयार असायचा.

चित्रपटासाठी ‘समर रिबेल’ हे शीर्षक का निवडले या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मुलांना एकसारखी स्थिती आवडत नाही, त्यांना बदल हे हवेच असतात.”
 


* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690499) Visitor Counter : 184