मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
देशातील एव्हिअन इन्फ्लूएंझाची सद्यस्थिती
Posted On:
19 JAN 2021 8:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021
देशात आज, दि. 19 जानेवारी, 2020 पर्यंत एव्हिअन फ्लूचा प्रादुर्भाव पाच राज्यामधल्या कुक्कुटपालन केंद्रात आणि 10 राज्यांमध्ये कावळे, स्थलांतरित पक्षी तसेच वन्य पक्षांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे.
केरळमधील अल्लापुझा जिल्हा आणि महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील (चिखरी आणि तलाहारी गावे), सातारा जिल्ह्यातील (मराई वाडी), लातूर जिल्ह्यातील (दावणगाव), नागपूर जिल्ह्यातील (वारंगा), गडचिरोली जिल्ह्यातील (गडचिरोली), मुंबई विभागातील (कल्याण, ठाणे) आणि बीड जिल्ह्यातील(वाराटी) येथे कुक्कुटपालन केंद्रातील नमुन्यांमध्ये एव्हिअन इन्फ्लूएंझाची पुष्टी झाली आहे.
उत्तर प्रदेश (अलिगंज,-कावळा) आणि पंजाब (रूपनगर-हंस) मध्ये कावळा / स्थलांतरितपक्षी / वन्य पक्ष्यांमध्ये एव्हिअन इन्फ्लूएंझाची पुष्टी झाली आहे.
महाराष्ट्रात, परभणी जिल्हा आणि सीपीडीओ, मुंबई मधील महत्वाची केंद्र येथे नियंत्रण आणि प्रतिबंधक कामे पूर्ण झाली असून स्वच्छता प्रक्रिया चालू आहे. इतर सर्व बाधित भागातजलद प्रतिसाद दल पाठवण्यात आले असून कुक्कुटपालन केंद्रातील पक्षी नष्ट करण्याचे काम सुरु आहे . ज्या ठिकाणी कावळे / स्थलांतरीत पक्षी / वन्य पक्ष्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे त्या ठिकाणी पाळत ठेवण्याचे काम चालू आहे.
देशातील बाधित भागाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन केलेळे केंद्रीय पथक बाधित भागांना भेट देत आहे, या पथकाने एव्हिअन इन्फ्लूएंझाच्या उद्रेक आणि साथीच्या रोगांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील रायगड व पुणे जिल्ह्याचा दौरा केला.
एव्हिअन इन्फ्लूएंझा 2021 ची तयारी, नियंत्रण आणि प्रतिबंध यासासाठी तयार केलेल्या सुधारित कृती योजनेच्या आधारे सर्व राज्ये राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी अवलंबिलेल्या नियंत्रण उपाययोजनांबाबत दररोज विभागाला अहवाल पाठविला जातो.
मंत्रालय,ट्विटर, फेसबुक हँडल या सोशल मीडिया व्यासपिठांच्या माध्यमातून एव्हीयनविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत आहे.
Jaydevi P.S/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690169)
Visitor Counter : 110