माहिती आणि प्रसारण मंत्रालय

“ध्वनीविषयी–विशेषतः नैसर्गिक आणि सभोवतालच्या आवाजांविषयी संवेदनशील असणे अत्यावश्यक, कारण ते ध्वनी तुमच्या कथानकात भर घालत असतात.”: एफटीआयआयचे सहयोगी प्राध्यापक मधू अप्सरा,


सिनेमा प्रेक्षकांना वास्तववादी वाटण्यात ध्वनीची भूमिका अत्यंत महत्वाची, चित्रपटातील दृश्यांशी संवाद आणि ध्वनीची सांगड अचूक असायला हवी

पणजी, 19 जानेवारी 2021

प्रेक्षकांसमोर वास्तवदर्शी चित्रपट सादर करण्यात ध्वनीची भूमिका अत्यंत महत्वाची असते. सिनेमातील दृश्यांशी, ध्वनी आणि संवाद यांची सांगड अचूक आणि योग्य ताळमेळ साधत घातली गेली पाहिजे, त्यात कुठलाही विलंब नको, तसेच वस्तू, दृश्य, कृती जशी दिसते आहे, तसाच खरा ध्वनी वापरला जावा, असा सल्ला एफटीआयआय मधील सहयोगी प्राध्यापक मधू अप्सरा यांनी दिला. जिथे गरज वाटेल तिथे चित्रपट अधिक परिणामकारक करण्यासाठी ध्वनीचा योग्य वापर करायला हवा, असे त्यांनी सांगितले. गोव्यात सुरु असलेल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-इफ्फीच्या आजच्या चौथ्या दिवशी, चित्रपट समीक्षण सत्रात, साऊंड डिझाईन इन सिनेमा’(चित्रपटात ध्वनी संयोजनाचा वापर) या विषयावर ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिलेल्या व्याख्यानात त्यांनी हा सल्ला दिला.

ध्वनिविषयी संवेदनशील असणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः नैसर्गिक आणि सभोवतलाच्या सूक्ष्म आवाजांविषयी संवेदनशील असले पाहिजे कारण हे आवाज आपल्या कथानकाला वेगळा अर्थ देत असतात., असे मत त्यांनी व्यक्त केले. मायक्रोफोन सतत तपासात रहायला हवेत तसेच, प्रत्येकवेळी सगळेच ध्वनी एकत्र करता येणार नाहीत, अशावेळी गरजेनुसार आवश्यक तेवढेच आवाज वाढवता येतील, असेही त्यांनी सांगितले.

उत्तम परिणामकारकतेसाठी ध्वनी संयोजकाने आपल्या उपकरणांकडे कायम लक्ष ठेवावे कारण प्रत्येक ध्वनी स्वतंत्र अर्थ व्यक्त करत असतो त्यामुळे कुठला एक ध्वनी आवश्यक नाही, असे आपण म्हणू शकत नाही.

सिनेमानिर्मितीत हवे त्या भावना आणि परिणामकारकता आणण्यासाठी उत्तम ध्वनीसंयोजनाची भूमिका अत्यंत मोलाची असते, असे सांगत, प्रा अप्सरा म्हणाले की एडिटिंग करतांना सर्वच ध्वनी एकत्र मिसळणे योग्य नसते. एखादी परिस्थिती किंवा दृश्याशी विसंगत ठरेल, असे ध्वनी संयोजन कधीही करु नये, ध्वनी देताना, कथानकातील दृश्य, सभोवतालची भौगोलिक परिस्थिती यांचा विचार न करता, दृश्यातील भाव-भावनांना न्याय देता येईल, असे ध्वनी संयोजन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. कथानकाचा आशय न घालवता, चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोचवणे महत्वाचे आहे, आणि ध्वनी हे दृश्य परिणामकारकपणे पोचवण्यात महत्वाचे काम करते. प्रत्येक ध्वनी, प्रेक्षकांच्या मनात एक प्रतिमा निर्माण करत असतो, हे लक्षात ठेवावे, असे प्रा अप्सरा यांनी सांगितले.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1690108) Visitor Counter : 259