कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ईशान्य प्रदेश परिषदेच्या 69 व्या पूर्ण सत्राचे आयोजन

Posted On: 19 JAN 2021 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मेघालयमधील  शिलाँग येथे  येत्या  23 आणि 24 जानेवारी 2021 रोजी ईशान्य प्रदेश परिषदेच्या 69 व्या पूर्ण सत्राचे आयोजन केले आहे. या बैठकीला राज्यमंत्री पीएमओ (स्वतंत्र प्रभार), ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय (डीओएनईआर) आणि उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र सिंह आणि एनईसी अर्थात  ईशान्य प्रदेश परिषदेचे सदस्य आणि इतर सदस्य उपस्थित राहतील. यावेळी ईशान्येकडील राज्यातील आणि भारत सरकारच्या प्रमुख मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

शिलॉंग येथे आयोजित करण्यात आलेल्या ईशान्य प्रदेश परिषदेच्या 69 व्या पूर्ण सत्राची तयारी  आणि कार्यपद्धतींचा आढावा घेण्यासाठी डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीत एमडीओएनईआर आणि एनईसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

या दोन दिवसीय सत्रादरम्यान डीओएनईआर मंत्रालय, एनईसी, राज्य सरकारे तसेच निवडक केंद्रीय मंत्रालये ईशान्येकडील विविध विकासात्मक उपक्रम आणि भविष्यातील योजनांविषयी सादरीकरणे करतील. या पूर्ण सत्रात चालू प्रकल्पांच्या प्रगतीवर, 68 व्या पूर्ण सत्रातील कामकाजाची  अंमलबजावणी, ईशान्येकडील राज्यांसाठी केंद्रीय मंत्रालयांनी केलेला खर्च, आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात मार्च 2021 नंतरच्या कालावधीसाठीच्या प्रस्तावित  योजनांबद्दल विचारविनिमय आणि चर्चा करणे अपेक्षित आहे.

 

Jaydevi P.S/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690102) Visitor Counter : 108