सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

स्थानिक रोजगार निर्मिती, खादी कारागीर आणि आदिवासींच्या बळकटीकरणाच्या उद्देशाने केव्हीसीआयने आदिवासी व्यवहार मंत्रालया सोबत केला सामंजस्य करार

Posted On: 19 JAN 2021 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021

 

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खादीचे कपडे खरेदी करण्यसाठी आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची (पीएमईजीपी) अंमलबजवणी करणारी संस्था म्हणून आदिवासी व्यवहार मंत्रालया सोबत भागीदारी करण्यसाठी, खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आज दोन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. एमएसएमई मंत्री नितीन गडकरी आणि आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

आदिवासी व्यवहार मंत्रालयाने वर्ष 2020-21 मध्ये मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणाऱ्या एकलव्य निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 14.77 कोटी रुपये किंमतीचे 6 लाख मीटर हून अधिक खादीचे कापड खरेदी केले अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. दरवर्षी एकलव्य शाळांच्या संख्येत होत असलेल्या वाढी सोबतच खादीचे कापड खरेदी करण्याचे प्रमाण देखील वाढत आहे असे ते म्हणाले.

एमएसएमई मंत्री  नितीन गडकरी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना

आदिवासींच्या आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळ (एनएसटीएफडीसी) ही संस्था पीएमपीपी योजनेच्या अंमलबजावणीसाठी  भागीदार म्हणून कार्य करेल असे आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले. एनएसटीएफडीसी सर्व आर्थिक  क्षेत्रातील इच्छुक अनुसूचित जमातींच्या उद्योजकांना मदत करण्यासाठी सवलतीच्या दारात कर्ज योजना प्रदान करते. अशा प्रकारे हा सामंजस्य करार आदिवासींना विविध वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी आणि स्वयं-रोजगाराच्या संधी निर्माण करण्यसाठी लाभकारक ठरेल. एनएसटीएफडीसी आणि केव्हीआयसीच्या एकत्रित कामकाजामुळे एसटींमध्ये पीएमईजीपी योजनेची व्याप्ती वाढेल.

सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना आदिवासी व्यवहार मंत्री  अर्जुन मुंडा

पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत व्हिजन ला अनुरूप हे सामंजस्य करार असून , खादी कारागीर आणि मोठ्या संख्येने आदिवासींच्या बळकटीकरणाच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्मितीच्या  उद्देशाने हे करार करण्यात आले आहेत.

 

 

 

M.Iyengar/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1690099) Visitor Counter : 226