वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
बौद्धिक मालमत्ता हक्कांच्या क्षेत्रात संबंध वृध्दिंगत करण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी भारत-ईयू आयपीआर संवादाची पहिली फेरी पार पडली
Posted On:
19 JAN 2021 6:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021
युरोपियन संघ आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागादरम्यान आभासी मंचाच्या माध्यमातून 14 जानेवारी , 2021 रोजी पहिला भारत-युरोपिअन संघ आयपीआर संवाद झाला. भारत-युरोपियन संघातील संबंध अधिक दृढ करणे आणि बौद्धिक मालमत्ता हक्कांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणे हे या संवादाचे उद्दिष्ट होते.
या बैठकीचे सह अध्यक्षपद डीपीआयआयटीचे संयुक्त सचिव रवींदर आणि युनिट इन्व्हेस्टमेंट अँड इंटेलॅचुअल प्रॉपर्टी, डीजी ट्रेड, युरोपियन कमिशनचे प्रमुख कार्लो पेटीनाटो यांनी भूषवले. युरोपिअन संघ आयोग आणि डीपीआयआयटी यांनी संयुक्तपणे याचे आयोजन केले होते. भारताकडून परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, कृषी मंत्रालय, आरोग्य विभाग आणि महसूल विभाग, आणि युरोपियन संघाकडून युरोपियन आयोगाची अनेक महासंचालनालये यांनी या संवादात संवाद साधला.
राष्ट्रीय आयपीआर धोरण 2016 मधील उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने विविध आयपीआर घडामोडींचा भारताच्या उपाध्यक्षांनी आढावा घेतला. त्यांनी स्टार्ट-अप्स आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने केलेल्या कायदेविषयक सुधारणांच्या महत्वाचा त्यांनी पुनरुच्चार केला. या संदर्भात भारत सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचे युरोपिअन संघाच्या प्रतिनिधींनी कौतुक केले.
युरोपियन संघाच्या सह अध्यक्षांनी डीजी व्यापार आणि विविध उपक्रमांचा मुक्त व्यापार करार आणि बौद्धिक मालमत्ता अधिकारांच्या प्रभावी अंमलबजावणीसह विविध उपक्रमांचा थोडक्यात आढावा सादर केला.
सुरुवातीच्या निवेदनानंतर आयपी पद्धतीच्या विशिष्ट क्षेत्रांविषयी माहितीची देवाणघेवाण झाली.
संवादाच्या अखेरीस सह-अध्यक्षांनी सर्व प्रतिनिधींचा विशेषतः कोविड 19 महामारीच्या आव्हानात्मक काळात द्विपक्षीय संबंध दृढ करण्यात सहभाग व पुढाकार घेतल्याबद्दल आभार मानले. हा संवाद उद्योग संस्थांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वपूर्ण बौद्धिक मालमत्तेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि दोन्ही अर्थव्यवस्थांच्या परस्पर फायद्यासाठी सहकार्य क्षेत्रे निवडण्यासाठी प्रभावी मंच आहे.
M.Iyengar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690069)
Visitor Counter : 208