मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

देशातील एव्हिअन फ्लूची सद्यस्थिती

Posted On: 18 JAN 2021 9:51PM by PIB Mumbai

 

देशात आज, दि. 18 जानेवारी, 2020 पर्यंत एव्हिअन फ्लूचा प्रादुर्भाव पाच राज्यामधल्या कुक्कुटपालन केंद्रात आणि 9 राज्यांमध्ये कावळे, स्थलांतरित पक्षी तसेच वन्य पक्षांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्रामध्ये आरआरटी अर्थात जलद प्रतिसाद दल तैनात करण्यात आले आहे. मुंबईतल्या सीपीडीओसहित सर्व बाधित केंद्रांमध्ये, बाधित पक्षांना नष्ट करण्यात येत आहे. तसेच स्वच्छता  आणि निर्जंतुकीकरणाची प्रक्रियाही करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातल्या केंद्रेवाडी, अहमदपूर या गावांमध्ये आणि उदगीर तालुक्यातील सुकानी गाव, तोंडर गाव (वाजरावाडी) आणि औसा तालुक्यातील कुर्डवाडी गावांमध्ये प्रादुर्भाव दिसून आला आहे.

देशात ज्या ज्या ठिकाणच्या प्राण्यांमध्‍ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे, तिथे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय पथक भेट देत आहे. तसेच या रोगाच्या कारणांचा शास्त्रीय अभ्यास करण्यात येत आहे. केंद्रीय पथकाने केरळला भेट देऊन पाहणी केली आहे.

एव्हिअन फ्लूविषयी जनमानसामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विभागाच्या वतीने व्टिटर, फेसबुक अशा समाज माध्यमांचा वापर करण्यात येत आहे.

 

S.Kane/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689836) Visitor Counter : 141