रेल्वे मंत्रालय

आज रवाना करण्यात आलेल्या आठ गाड्या आणि पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या रेल्वे प्रकल्पांची माहिती

Posted On: 17 JAN 2021 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील  विविध ठिकाणांहून केवडीयाला जाणाऱ्या आठ नवीन रेल्वे गाड्यांना आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केले आणि दाभोई - चांदोड गेज रुपांतरित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग (18 किमी), चांदोड ते केवडिया (32 किमी) पर्यंत नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग , नव्याने विद्युतीकरण केलेला  प्रतापनगर - केवडिया मार्ग (80 किमी) आणि दाभोई, चांदोड व केवडिया या नवीन स्थानक इमारतींचेही  पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले.

50 किमी लांबीचा दाभोई - चांदोड - केवडिया मार्ग हा  18 किमी लांबीचा दाभोई - चांदोड नॅरो गेज मार्गाचे  ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करून पुढे तो चांदोड ते केवडिया (32 कि.मी.) पर्यंत विस्तारण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या 100% रेल्वे विद्युतीकरण धोरणानुसार प्रतापनगर - केवडीया मार्गाचे (80 आरकेएम)चे विद्युतीकरण करण्यात आले आहे. यामुळे आता आपल्या देशाच्या सर्व दिशांकडून जलद रेल्वेसेवा उपलब्ध होईल.

भारताला जोडणे, भारताला एकत्र आणणे

केवडियाला भारताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, मध्य व दक्षिण भागाशी जोडणार्‍या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Sr.

No

Train No

From

To

Train Name &  frequency

1

09103/04

Kevadiya

Varanasi

Mahamana Express (Weekly)

2

02927/28

Dadar

Kevadiya

Dadar-Kevadiya Express (Daily)

3

09247/48

Ahmedabad

Kevadiya

Janshatabdi Express (Daily)

4

09145/46

Kevadiya

H. Nizamuddin

Nizamuddin – KevadiyaSamparkKranti Express (Bi-Weekly).

5

09105/06

Kevadiya

Rewa

Kevadiya – Rewa Express (Weekly)

6

09119/20

Chennai

Kevadiya

Chennai - Kevadiya Express (Weekly)

7

09107/08

Pratapnagar

Kevadiya

MEMU train (Daily)

8

09110/09

Kevadiya

Pratapnagar

MEMU train (Daily)

 

आज रवाना  करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांबरोबर खालील रेल्वेगाड्यांची सेवेस सुरु झाली आहे

Sr.

No

Train No

From

To

Train Name &  frequency

9

09249/50

Ahmedabad

Kevadiya

Janshatabdi Express (Daily)

10

09113/14

Pratapnagar

Kevadiya

MEMU train (Daily)

 

इंग्रजीतील मूळ बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689425) Visitor Counter : 179