वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत जागतिक फंडांसमवेत झालेल्या गोलमेज बैठकीत जगभरातल्या 70 हून अधिक फंडांचा सहभाग


सर्वात नवोन्मेशी राष्ट्र बनण्याची भारताची क्षमता असल्याची भावना अनेक फंडांकडून व्यक्त

Posted On: 16 JAN 2021 2:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021

प्रारंभ या स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी, 15 जानेवारी 2021 ला वाणिज्य आणि उद्योग विभागाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने जागतिक फंडांसमवेत गोलमेज बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अमेरिका,जपान,कोरिया, सिंगापूर मधले 70 वेंचर कॅपिटल फंड आणि भारतात अधिवास असणारे जागतिक फंड सहभागी झाले. या फंडांची  भारतीय क्षेत्रात 41 अब्ज अमेरिकी डॉलर्स असेट अंडर मॅनेजमेंट आणि जागतिक असेट अंडर मॅनेजमेंट 143 अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव डॉ गुरुप्रसाद मोहपात्रा, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सह सचिव अनिल अग्रवाल, महत्वाचे भारतीय नियामक, धोरणकर्ते आणि जागतिक वेंचर कॅपिटल फंड सहभागी झाले.

जागतिक फंडाच्या चिंतांची दखल घेणे, भारतीय स्टार्टअपच्या सध्याच्या  प्रगतीचा अहवाल मांडणे, भारतातल्या नवोन्मेषावर जागतिक भांडवल गुंतवणुकीला चालना देण्यासाठीच्या गुंतवणुक मार्गांवर चर्चा करणे त्याच बरोबर जागतिक वेंचर फंडांसाठी व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

भारतीय स्टार्ट अप्सची  विकास क्षमता, गिफ्ट सिटी मध्ये उपलब्ध संधी आणि वेंचर कॅपिटल-स्टार्ट अप परीरचनेचा व्यापक आढावा यावर यावेळी चर्चा झाली. भारत सरकारसमवेत चर्चा करण्यात येणाऱ्या सर्वोच्च नियामक मुद्यांबाबतही यावेळी बोलणी झाली. जगातल्या सर्वात मोठ्या स्टार्ट अप परिरचनापैकी, भारताची स्टार्ट अप परिरचना तिसऱ्या क्रमांकाची असून गेल्या दशकात त्यात मोठे परिवर्तन झाले आहे याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. शिक्षण, ई कॉमर्स, यासारख्या क्षेत्रात 2020 च्या उत्तरार्धात  K या आकाराप्रमाणे परिस्थिती सुधारत आहे तर  पर्यटन आणि आतिथ्यशीलता या क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे.

येत्या 10-15 वर्षात जगातले सर्वात नवोन्मेशी राष्ट्र बनण्याची भारताची क्षमता असल्याची भावना यावेळी काही फंडानी व्यक्त केली. भारतात स्टार्ट अप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याकरिता पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी भारत सरकारने उचललेली पावले, गती आणि दिशा याची काही सहभागीनी प्रशंसा केली. हे क्षेत्र गुंतवणूकदारांसाठी अधिक पोषक राहण्याच्या दृष्टीने सूचनाही यावेळी करण्यात आल्या. स्टार्ट अप्सना सहाय्य करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने याआधीच अनेक पावले उचलली असून भविष्यातही पावले उचलण्यात येणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. स्टार्ट अप्स साठी सुरवातीच्या स्तरापासूनच सहाय्य करण्यासाठी वेंचर कॅपिटलना त्यांनी आमंत्रित केले ज्यायोगे स्टार्टअपसाठी वैविध्य आणि विस्तार शक्य होईल.    

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1689041) Visitor Counter : 203