संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्कराने सैन्य दिन संचलनादरम्यान ड्रोनस्वार्मिंग अर्थात  ड्रोनच्या  सामूहिक कृती  क्षमतेचे थेट  प्रात्यक्षिक दाखवले

Posted On: 15 JAN 2021 6:24PM by PIB Mumbai

 

भारतीय लष्कराने सैन्य दिन संचलनादरम्यान 15 जानेवारी 2021 रोजी दिल्ली छावणी परिसरात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून  75 देशी बनावटीच्या ड्रोनचा वापर करून  ड्रोन सामूहिक कृती  क्षमतेचे थेट प्रात्यक्षिक दाखवले.

भविष्यातील सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाद्वारे सक्षम असलेल्या दलात स्वतःला रूपांतरित करण्यासाठी भारतीय लष्कर सातत्याने उदयोन्मुख आणि विनाशकारी तंत्रज्ञान आत्मसात  करत असल्याचे  यातून दिसून येते.  या तंत्रज्ञानासाठी भारतीय लष्कराकडून कृत्रिम बुद्धिमत्ता ,स्वायत्त शस्त्रे प्रणाली क्वांटम टेक्नॉलॉजीज, रोबोटिक्स, क्लाऊड कॉम्प्यूटिंग आणि अल्गोरिदम वॉरफेअर या मध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे.

भारतीय लष्कराने भविष्याची स्वप्ने बघणारेस्टार्टअप्स, सूक्ष्म,लघु बाबी माध्यम उद्योग , खाजगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था  (डीआरडीओ) आणि संरक्षण  सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (डीपीएसयू) यांच्या समन्वयाने तंत्रज्ञानाचे विस्तृत उपक्रम हाती घेतले आहेत. असाच एक प्रकल्प म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) ऑपरेशनल ड्रोन ऑपरेशन्स जो भारतीय  स्टार्ट अपने विकसित केला आहे.

हा प्रकल्प म्हणजे देशाला शस्त्रास्त्रांच्या मंचावर स्वायत्तता देण्याबरोबरच भारतीय सैन्याच्या, मनुष्य बळाला  आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या वचनबद्धतेचे दर्शन घडवतो.

 

 

Jaydevi P.S/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1688843) Visitor Counter : 165