ऊर्जा मंत्रालय
पीएफसी लिमिटेड दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी 5000 कोटी रुपयांचे कर्जरोखे जाहीर करणार
या कर्जरोख्यांवर परीपूर्तता होतेवेळी 7.15% कूपन दर प्रतीवर्ष प्रत्येक डॉलर आकारला जाईल
500 कोटी रुपयांचे बेस इश्यू आणि 4500 कोटी रुपयांचे ओव्हर सबस्क्रीप्शन असे एकूण 5000 कोटी रुपयांचे कर्जरोखे जाहीर करण्यात येणार आहेत, जे 10,000 कोटींच्या स्वमर्यादेत आहे
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार वाटप
Posted On:
14 JAN 2021 3:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जानेवारी 2021
पाॅवर फायनान्स लिमिटेड काॅरपोरेशन ही भारतातील आघाडीच्या आर्थिक कंपन्यांपैकी एक आहे, जिचे लक्ष्य विद्युत क्षेत्रावर असून दिनांक15 जानेवारी 2021 रोजी ही कंपनी तिच्या 5000 कोटी रुपयांच्या सार्वजनिक, सुरक्षित आणि विमोचनयोग्य अपरावर्तित कर्जरोख्यांची घोषणा करणार आहे. रोख्यांचा बेस आकार 500 कोटी रुपये असून त्यात 4500 कोटी रुपयांचे ओव्हर सबस्क्रीप्शन असे 5000 कोटी रुपये पर्यंतचा पर्याय असून तो 10000 कोटी रुपयांच्या मर्यादेच्या आत आहे. या नाॅन कन्व्हर्टीबल कर्जरोख्यांचे मूल्य प्रत्येकी 1000 रुपये आहे. पीएफसीच्या संचालक मंडळाच्या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार ट्रेंच आय इश्यू दिनांक 29 जानेवारी 2021च्या आधी अथवा मुदतवाढीचा पर्याय देऊन बंद करण्यात येईल.
* * *
U.Ujgare/S.Partagonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688536)
Visitor Counter : 194