इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना इंजिनियरिंग ग्राफिक अभ्यासक्रमाची सर्व प्रश्नोत्तरे एकाच जागी उपलब्ध करून देणाऱ्या CollabCAD सॉफ्टवेअरचे उद्या एनआयसी आणि सीबीएसईकडून संयुक्त उद्‌घाटन
CollabCAD सॉफ्टवेअरची हाताळणी आणि शालेय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण देण्याबाबत एनआयसी आणि सीबीएसई यांच्यात सामंजस्य करार

एनआयसी, सीबीएसई आणि अटल इनोव्हेशन मिशन CollabCAD 3D मॉडेलिंग बाबत एक सर्वसमावेशक ई-पुस्तिका करणार प्रकाशित

Posted On: 13 JAN 2021 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021

राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC), MeitY आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) उद्या संयुक्तपणे कोलॅबकॅड- CollabCAD या सॉफ्टवेअरचे उद्‌घाटन करणार आहे. ही एक संगणकावर चालणारी सॉफ्टवेअर प्रणाली आहे ज्याद्वारे अभियांत्रिकी शाखेतील  विद्यार्थी आणि प्राध्यापकांनाही 2ड्राफ्टिंग आणि डीटेलिंग  पासून ते 3D प्रोडक्ट डिझाईन पर्यंत सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकेल.

तसेच राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग CollabCAD 3D मॉडेलिंग बाबत एक सर्वसमावेशक ई-पुस्तिकाही  प्रकाशित करणार आहे. या पुस्तिकेमुळे CAD च्या विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना CollabCAD सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर कसा करायचा याची माहिती मिळू शकेल. CollabCAD च्या NIC येथील समूहाने ही पुस्तिका तयार केली आहे.

देशभरातील विद्यार्थ्यांना 3D डिजिटल डिझाईन तयार करता यावे यासाठीचा मोठा प्लॅटफॉर्म म्हणून CollabCAD विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता आणि कल्पनाशक्तीला यातून मोठा वाव मिळेल.

सीबीएसईचे अध्यक्ष मनोज आहुजा यांच्या नेतृत्वाखाली, सीबीएसईच्या 140 पेक्षा जास्त शाळांमध्ये  CollabCAD अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही शिकवले जाईल. CollabCAD सॉफ्टवेअरचा वापर विविध प्रकारची 3D आणि 2D डिझाईन तयार करण्यासाठी करता येईल. ज्यातून विद्यार्थ्यांना शालेय वयातच इंजिनियरिंग ग्राफिक्सच्या संकल्पना समजून घेता येतील.

CollabCAD सॉफ्टवेअरची हाताळणी आणि शालेय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण देण्याबाबत एनआयसी आणि सीबीएसई यांच्यात दहा वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार देखील यावेळी होईल.

उद्या सकाळी 11 वाजता होणाऱ्या या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट वेबकास्ट प्रसारण (https://webcast.gov.in/nic) यावर बघता येईल.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1688331) Visitor Counter : 7