उपराष्ट्रपती कार्यालय

मकर संक्रांति आणि पोंगलच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रतींकडून देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 13 JAN 2021 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021

उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू यांनी मकर संक्रांति आणि पोंगलच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा संपूर्ण शुभेच्छा संदेश पुढीलप्रमाणे.

मकर संक्रांति आणि पोंगलच्या शुभ मुहूर्तावर सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा.

मकर संक्रांतीने उत्तरायणाला आरंभ होतो. उत्तरायण म्हणजे सूर्याच्या उत्तरेकडील प्रवासाचा आरंभ. देशभरात विविध नावांनी हा उत्सव साजरा होतो. हा उत्सव सुगीच्या मोसमाशी निगडित आहे तसेच आपल्या संस्कृतीत बांधलेल्या सर्व भारतीयांना जोडणारा लक्षणीय दुवा आहे.

कृषी निगडीत हा सण निसर्गाचे औदार्य आणि चैतन्याचा उत्सव अद्वितीय पद्धतीने साजरा करतो, आणि आपल्याला निसर्गमातेशी असलेल्या नात्याची जाणीव करून देतो. आपल्या संस्कृतीची निसर्गावर असलेली दृढ श्रद्धा या सणातून दिसून येते. आपली ग्रामीण भागात रुजलेली मुळे आठवण्यासाठी आणि पुन्हा-पुन्हा जपण्यासाठी आपल्या परंपरा आणि संस्कृती जपण्याचा हा उत्सव असतो.

हा सण आपल्या कुटुंबियांना आनंदात जावो. आपल्या देशातील बंधुभाव वाढीला लागो आणि येत्या महिन्यांमध्ये सुरू होणाऱ्या चांगल्या काळाची हा शुभारंभ ठरो.

 

S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1688327) Visitor Counter : 185