संरक्षण मंत्रालय
भारत आणि व्हिएतनाम यांच्यात 13 वा संरक्षण सुरक्षितता संवाद
Posted On:
12 JAN 2021 6:59PM by PIB Mumbai
भारताचे संरक्षण सचिव डॉ. अजयकुमार आणि आणि त्यांचे समकक्ष सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामचे उपसंरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल नुग्वेन ची विन्ह
यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 12 जानेवारी 2021 रोजी, भारत व्हिएतनाम संरक्षण सुरक्षितता संवादाची 13 वी फेरी पार पडली. या दूरदृश्य माध्यमातून झालेल्या संवादात संरक्षण सचिव आणि उपसंरक्षण मंत्री यांनी कोविड -19 ने घातलेल्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्याबाबत समाधान व्यक्त केले.
या दूरदृश्य संवादात, संरक्षण सचिव आणि उपसंरक्षण मंत्री यांनी ,डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामचे पंतप्रधान महामहिम नुग्वेन झूआन फूक यांच्यात झालेल्या आभासी शिखर परीषदेतील बैठकीत झालेल्या कृतीयोजनेविषयी आपली मते व्यक्त केली.संरक्षण सहकार्याच्या नव्या विषयांवरही यावेळी चर्चा झाली.
दोन्ही देशांत वाढत असलेल्या संरक्षण सहकार्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला. दोन्ही बाजूंच्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या पुढाकाराच्या प्रगतीचा या दोन्ही बाजूंनी आढावा घेतला आणि सशस्त्र सैन्यदलातील व्यापक रणनीतीच्या भागिदारीच्या चौकटीत अधिक गुंतवणूक करण्याबद्दल प्रतिबध्दता व्यक्त केली. अलिकडच्या काळात आपापल्या देशांनी संरक्षण उद्योग आणि तंत्रज्ञान सहकार्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे याबाबत दोन्ही बाजूंचे एकमत झाले आणि या क्षेत्रात अधिक सहकार्याची आशा व्यक्त केली.
***
S.Tupe/Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688021)
Visitor Counter : 259