भारतीय स्पर्धा आयोग
वर्चुसा कॉर्पोरेशनमध्ये ऑस्टीन होल्ड कंपनी, जीआयसी इन्व्हेस्टर आणि सीपीपीआयबी इन्व्हेस्टर यांच्याकडून 100 % समभाग अधिग्रहणासाठी प्रस्तावित समन्वय आणि सह नियंत्रणाला सीसीआयची मंजुरी
Posted On:
12 JAN 2021 1:42PM by PIB Mumbai
वर्चुसा कॉर्पोरेशनमध्ये ऑस्टीन होल्ड कंपनी, जीआयसी इन्व्हेस्टर आणि सीपीपीआयबी इन्व्हेस्टर यांच्याकडून 100 % समभाग अधिग्रहणा साठी प्रस्तावित समन्वय आणि सह नियंत्रणाला सीसीआय, भारतीय स्पर्धात्मकता आयोगाने मंजुरी दिली आहे.
बारिंग प्रायव्हेट इक्विटी आशिया (बीपीईए) (ऑस्टीन होल्ड कंपनीद्वारे) अटागो इन्व्हेस्टमेंट (जीआयसी इन्व्हेस्टर) आणि सीपीपी इन्व्हेस्टमेंट बोर्ड प्रायव्हेट होल्डिंग (4) (सीपीपीआयबी इन्व्हेस्टर) यांच्याकडून विर्तुसा कॉर्पोरेशनमध्ये हा 100 % समभाग अधिग्रहणासाठी प्रस्तावित समन्वय आणि सह नियंत्रणासाठी आहे.
ऑस्टीन होल्ड कंपनी डेलावेअर मधली असून सध्या कोणत्याही व्यवसायात गुंतलेली नाही. बीपीईए ही आंतरराष्ट्रीय प्रायव्हेट इक्विटी कंपनी असून आशिया मध्ये प्रायव्हेट इक्विटी गुंतवणुकीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
जीआयसी इन्व्हेस्टर ही अपस्टार इन्व्हेस्टमेंटच्या मालकीची असून ती जीआयसी (वेंचर) च्या मालकीची आहे. जीआयसी इन्व्हेस्टर ही विशेष हेतू कंपनी आहे.
सीपीपीआयबी इन्व्हेस्टर कॅनडीयन महामंडळ असून कॅनडीयन पेन्शन प्लान इन्व्हेस्टमेंट बोर्ड सहाय्यक कंपनीच्या मालकीची आहे. ही गुंतवणूक होल्डिंग कंपनी, वैविध्यपूर्ण मालमत्ता गुंतवणूक करते.
वर्चुसा ही जागतिक माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. आपल्या सहाय्यक कंपन्याद्वारे भारतात माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापार आणि माहिती तंत्रज्ञान सल्ला सेवा, तंत्रज्ञान अंमलबजावणी सेवा डिजिटल इंजिनीयरिंग, क्लाऊड सोल्युशन पुरवते.
U.Ujgare/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687886)
Visitor Counter : 239