पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

देशातल्या संरक्षित क्षेत्रांची क्रमवारी लावून त्यांना दरवर्षी सर्वोत्कृष्टतेचा पुरस्कार देणार - प्रकाश जावडेकर

Posted On: 11 JAN 2021 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2021


पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज देशातल्या 146 राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य यांच्यासाठी व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन (एमईई) पत्रक जाहीर केले. सध्या देशामध्ये 903 स्थाने संरक्षित क्षेत्रे आहेत. या संरक्षित स्थानांनी देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी 5 टक्के क्षेत्र व्यापले आहे. संरक्षित क्षेत्राच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे. 

WhatsApp Image 2021-01-11 at 16.12.39.jpeg

या कार्यक्रमामध्ये बोलताना प्रकाश जावडेकर म्हणाले, इतर देश जे साध्य करू शकले नाहीत, ते भारताने साध्य केले असून आज भारतामध्ये समृद्ध जैवविविधता आहे. जगातल्या वाघ्रसंख्येपैकी 70 टक्के वाघ भारतामध्ये आहेत तर अशियाई सिंहांचे प्रमाणही 70 टक्के आहे. तसेच जगाच्या संख्येमध्ये 60 टक्के बिबटे भारतात आहेत. या विशाल मार्जार परिवारातल्या प्राण्यांची भरपूर संख्या भारतात आहे. विशेष म्हणजे या वन्यप्राण्यांची वाढती संख्या अन्नसाखळीच्या दृष्टीने आणि एकूण परिसंस्थेसाठी अतिशय चांगली गोष्ट दर्शवित असल्याचे पर्यावरण मंत्री जावडेकर म्हणाले. 

WhatsApp Image 2021-01-11 at 16.43.20.jpeg

यावर्षीपासून देशातल्या दहा राष्ट्रीय उद्यानांना, 5 किनारपट्टी आणि सागरी उद्यानाना तसेच पाच वन्य प्राणी संग्रहालयांना सर्वोत्कृष्टतेचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी यावेळी जाहीर केले. त्यांची क्रमवारी लावून पुरस्कार देण्यात येणार आहे. 

संरक्षित क्षेत्राचे व्यवस्थापन परिणामकारक मूल्यांकन (एमईई) हे व्यवस्थापकांसाठी एक महत्वाचे उदयोन्मुख साधन बनत आहे. या माध्यमातून संरक्षित क्षेत्रांचे व्यवस्थापन प्रणलीमध्ये सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची बलस्थाने आणि कमकुवतपणा जाणून घेता येतो. 

वन्यजीव आणि संरक्षित क्षेत्राचे विविध पैलू जाणून घेण्यासाइी एमईई एक अतिशय महत्वाचा दस्तऐवज मानला जातो. यामुळे संरक्षित क्षेत्राचा विस्तार करणे शक्य आहे. तसेच सागरी संरक्षित क्षेत्रासाठी नवीन आराखडा तयार करण्यासाठीही या दस्तऐवजाचा उपयोग होत आहे. 

भारतीय प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकनाचा आराखडा यावेळी प्रकाश जावडेकर यांनी प्रसिद्ध केला. हा आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे, निकष आणि मूल्यांकनासाठी संकेतक निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये प्राणीसंग्रहालयाच्या सर्वंकष विचार करण्यात येणार आहे.

मूल्यांकन निकष निश्चित करताना पारंपरिक संकल्पनांच्याही पुढे जाऊन विचार करण्यात आला आहे. त्यामध्ये प्राण्यांचे कल्याण, पशु संवर्धन, पालन पोषण आणि स्त्रोत तसेच वित्तीय शाश्वत व्यवस्थापन यांचाही विचार केला जात आहे, असे पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी सांगितले. 

भारतातल्या 146 राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांचा 2018-19 चा एमईई म्हणजेच व्यवस्थापन परिणामकारक मूल्यांकन अहवाल   


* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687761) Visitor Counter : 304