रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

परदेशात प्रवास करताना वाहन चालवण्याचा आंतरराष्ट्रीय परवाना नूतनीकरण सुलभतेसाठी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून नियम अधिसूचित

प्रविष्टि तिथि: 10 JAN 2021 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जानेवारी 2021

भारतीय नागरिक परदेशात असताना त्यांच्या वाहन चालवण्याच्या आंतरराष्ट्रीय परवान्याची (आयडीपी) मुदत संपल्यास नव्याने तो जारी करण्याबाबत केंद्रीय रस्ते, वाहतूक  आणि महामार्ग मंत्रालयाने 7 जानेवारी 2021 रोजी अधिसूचना जारी केली आहे.

नागरिक परदेशात असतील आणि त्यांचा परवाना कालबाह्य झाला असेल, तर या नूतनीकरण प्रक्रियेसाठी कोणतीही तांत्रिक यंत्रणा उपलब्ध नव्हती. आता, या नवीन सुधारणेनुसार, प्रस्तावित करण्यात आले आहे, की भारतीय नागरिक त्यांच्या परवाना नूतनीकरणासाठी परदेशातील भारतीय दूतावास / वाणिज्य दूतावासच्या  माध्यमातून अर्ज करू शकतात, असे अर्ज संबंधित आरटीओद्वारे विचारात घेण्यासाठी VAHAN या भारतातील पोर्टलकडे पाठवले जातील.  संबंधित आरटीओद्वारे परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या त्याच्या/तिच्या परदेशातील पत्त्यावर हे परवाने  कुरिअर सेवेद्वारे पाठवले जातील.

या अधिसूचनेमुळे भारतातील आयडीपीसाठी विनंती करताना वैद्यकीय प्रमाणपत्र आणि वैध व्हिसाची अट देखील वगळण्यात आली आहे. यामागची कल्पना अशी आहे की, ज्या नागरिकाकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना आहे, त्यांना अन्य  वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच असे काही देश आहेत जेथे व्हिसा ऑन अरायव्हल पद्धतीने किंवा प्रवासाच्या अखेरच्या क्षणी व्हिसा दिला जातो, अशा प्रकरणामध्ये  प्रवासापूर्वी भारतात आयडीपीसाठी अर्ज करताना व्हिसा उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून, आता आयडीपी अर्ज व्हिसाशिवाय  करता येऊ शकतो.

 

S.Kane/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1687483) आगंतुक पटल : 291
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Tamil , Telugu