नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

आयआरईडीए एनएचपीसीला हरित ऊर्जा प्रकल्पांमध्ये सहाय्य करेल; आज सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षऱ्या

Posted On: 08 JAN 2021 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2021
 

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणात असलेल्या  इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लि. (आयआरईडीए)ने आज ऊर्जा मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम एनएचपीसी लिमिटेड बरोबर नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी तांत्रिक अनुभव प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार केला.

या सामंजस्य करारांतर्गत, आयआरईडीए एनएचपीसीसाठी नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन प्रकल्पांचा तांत्रिक-आर्थिक आढावा घेईल. पुढील 5 वर्षांसाठी नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प निर्मिती आणि संपादन करण्यासाठी कृती योजना विकसित करण्यासाठी आयआरईडीए  एनएचपीसीला मदत करेल.

सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यावर आयआरईडीएचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणाले: “आयआरईडीए आणि एनएचपीसीला दोन संघटनांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी ही एक परिवर्तनीय संधी आहे. यामुळे ज्ञान आणि तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ होईल आणि सल्ला आणि संशोधन सेवा प्रदान होतील जे देशाच्या शाश्वत विकासात योगदान देईल. 

  
* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687098) Visitor Counter : 175