ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

6 जानेवारी 2021 रोजी भारतीय मानक ब्यूरोचा 74 वा स्थापना दिन साजरा

Posted On: 07 JAN 2021 5:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, वाणिज्य व उद्योग व रेल्वे मंत्री  पीयूष गोयल 6 जानेवारी 2021 रोजी भारतीय मानक ब्युरोच्या 74 व्या स्थापना दिन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी गोयल यांनी बीआयएसने त्यांच्या तीन प्रयोगशाळांमध्ये स्थापन केलेल्या खेळणी चाचणी सुविधांचे उद्‌घाटन केले, तसेच कसोटी आणि हॉलमार्किंग व गुणवत्ता नियंत्रणावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केल्याची घोषणा केली.

बीआयएसच्या अत्याधुनिक सुविधांची प्रशंसा करताना गोयल म्हणाले की सरकारने नुकतेच खेळणी ही बीआयएसच्या अनिवार्य प्रमाणीकरणांतर्गत आणल्यामुळे योग्य वेळी ही सुविधा केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. चाचणी सुविधा मानकांच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म आणि लहान उद्योगांसह  सुमारे 5000 हून अधिक औद्योगिक कंपन्यांना सक्षम करेल. हा उद्योग परदेशी उत्पादकांशी स्पर्धा करेल आणि निकृष्ट दर्जाच्या खेळण्यांच्या आयातीला लगाम घालू शकेल असे ते म्हणाले. या निर्णयामुळे  खेळण्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल तसेच  मुलांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळण्यास मदत करेल. आयात  खेळण्यांच्या स्पर्धेत भारतीय उत्पादने टिकून रहावी यासाठी  भारतीय खेळणी उद्योगाला मदत करण्याची सरकारची इच्छा असल्याचे गोयल म्हणाले. आयात केलेली खेळणी ही किंमतीच्या दृष्टीने स्वस्त असतील पण त्यांच्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे दीर्घकालीन असतात. 

भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) ने कसोटी आणि हॉलमार्किंग व गुणवत्ता नियंत्रण विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केल्याची घोषणा पियुष गोयल यांनी केली. हे अभ्यासक्रम ए आणि एच कर्मचार्‍यांसाठी आणि गुणवत्ता नियंत्रण कर्मचार्‍यांमधील क्षमता दरी सांधणे तसेच देशभरातील ए आणि एच केंद्रांमध्ये सक्षम मनुष्यबळ उपलब्धता करून देणे या दुहेरी उद्दीष्टांची पूर्तता करतील. यामुळे उद्योग, विशेषत: एमएसएमई, गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी आत्मनिर्भर होतील आणि त्याद्वारे सरकारच्या मेक इन इंडिया आणि कौशल्य भारत उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल.

यावेळी  गोयल यांनी भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) चे संस्थापक संचालक पद्मश्री डॉ. लाल सी वर्मन यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले.

 

S.Kane/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686816) Visitor Counter : 143